या कारणामुळे हिना खान बिग बॉस ११ या कार्यक्रमाचा हिस्सा बनली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 16:07 IST
बिग बॉस या कार्यक्रमाचा ११ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ...
या कारणामुळे हिना खान बिग बॉस ११ या कार्यक्रमाचा हिस्सा बनली नाही
बिग बॉस या कार्यक्रमाचा ११ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत असून यंदाच्या सिझनची शेजारी-शेजारी अशी थिम आहे. अभिनेता सलमान खानच यंदाच्या सिझनचे देखील सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांचा जीव की प्राण आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन प्रचंड गाजतात. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यानंतर या कार्यक्रमात कोणते कोणते स्पर्धक झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. या सिझनची घोषणा झाल्यापासून अनेक सेलिब्रिटींची नावे आपल्याला ऐकायला मिळत आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे नावारूपाला आलेली हिना खान बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचे कित्येक दिवसांपासून म्हटले जात आहे. हिना खान नुकतीच प्रेक्षकांना खतरों के खिलाडी या कार्यक्रमात दिसली होती. या कार्यक्रमानंतर तिला बिग बॉससाठी विचारण्यात आले आणि तिने यासाठी होकार देखील दिला असल्याचे म्हटले जात होते. हिनाला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याने हिनाच्या फॅन्सना खूपच आनंद झाला होता. पण हिना बिग बॉसमध्ये भाग घेणार नसल्याचे तिने नुकतेच मीडियाला सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हिनाने सांगितले आहे की, मी बिग बॉसमध्ये येणार आहे अशा बातम्या कोण देत आहे हेच मला कळत नाही. बिग बॉस या कार्यक्रमाच्या गेल्या दोन सिझनपासून या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी मला विचारण्यात येत आहे. पण मी नेहमीच यासाठी नकार दिला आहे. मला पुन्हा त्यांनी विचारले तर मी त्यांना नाहीच सांगणार आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात येण्याचा काही प्रश्नच नाहीये. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील करण मेहरा आणि रोहन मेहरा यांनी बिग बॉसमध्ये यापूर्वी हजेरी लावली आहे. Also Read : हिना खानचे हे फोटो नक्कीच पाहा