Join us  

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताने पहिल्यांदाच केल्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत खुलासा, म्हणाली- मी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:59 PM

शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली

शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर.रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. आज अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दररोज तिच्याशी निगडीत काही ना काही अपडेट नेटकऱ्यांना देत असते.  आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायमच उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात कोण आहे, ते काय करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न चाहते करतात. याचसाठी अपूर्वाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपूर्वाने चाहत्यांशी संवाद साधला. 

 या दरम्यान अपूर्वानं चाहत्यांसोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे. तिनं चाहत्यांशी संवाद साधताना तिच्या रिलेशनप स्टेटसबाबत खुलासा केला आहे. एका चाहत्यांने तिला तिच्या रिलेशनस्टेटस विषयी प्रश्न विचारला. तू सिंगल आहेस की तुझ लग्न झालं आहे. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, "मी सिंगल आहे पण हो माझ्या सोलमेटची वाट पाहत आहे".

अपूर्वा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेव्यतिरिक्त तिने अन्य काही लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे.  . अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले