Join us  

लॉड डाऊनदरम्यान पुन्हा तो खेळ रंगणार रसिकांच्या भेटीला, 'रात्रीस खेळ चाले' येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:42 PM

मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

छोट्या पडद्यावरील रसिकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. ही मालिका  अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. मात्र त्याच दरम्यान २१ दिवसांचे लॉक डाऊन करण्यात आले आणि मालिकांच्या शूटिंगही बंद झाल्या. रसिकांच्या खास मनोरंजनासाठी  पुन्हा एकदा रात्रीस खेळ चालेचा पहिले पर्व रसिकाच्या भेटीला येणार आहे.

‘डर सबको लगता है ‘ हे वाक्य ऐकलं की अनेक गोष्टी मनात येऊन जातात . मला कसली भीती असेल ? पण भीती ही सर्वांना असतेच , मात्र  बऱ्याच वेळा ही भीती आपल्याला सुखावून सुद्धा जाऊ शकते. नाही कळलं ? भीती जेव्हा मनोरंजनाच्या रूपात येते तेव्हा एखाद्या  चांगल्या कन्टेन्ट मुळें आपण मनातुन  घाबरतो मात्र त्याचाच आनंद सुद्धा आपल्याला होतोच . असाच भययुक्त आनंद ६ एप्रिल पासून आपली आवडती वाहिनी झी युवा आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे. 

कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली मालिका म्हणजे‘रात्रीस खेळ चाले.’ या मालिकेत एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक विचित्र गोष्टी  यांवर आधारित ही  मालिका अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय ठरली होती.  इसरलंय सारखे अनेक डायलॉग्स भरपूर प्रसिद्ब झाले .

सुयश टिळक , सुरुची अडारकर आणि सुहृद वऱ्हाडकर यांच्या अभिनयाने साकारलेली आणि झी युवावर लोकप्रिय ठरलेली भयकथा 'एक घर मंतरलेलं'  ही मालिका सुद्धा पुनर्प्रक्षेपीत होत आहे. प्रेक्षकांना पुन्हा त्या भयावह घरात जाण्याची आणि भय अनुभवण्याची संधी झी युवा  देणार आहे. एक घर मंतरलेलं या मालिकेतली सर्व आवडती पात्र आणि हे तुमच्या मनातलं घर तुमच्या भेटीला येत आहे .