Join us  

'सूर नवा...'च्या सूत्रसंचालनावरुन स्पृहा जोशीबरोबर होणाऱ्या तुलनेवर रसिकाने सोडलं मौन, म्हणाली, "मला तिच्याशी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 11:55 AM

स्पृहाबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने भाष्य केलं.

'सूर नवा ध्यास नवा' हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, हा शो एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. 'सूर नवा ध्यास नवा' शोला नवी अँकर मिळाली आहे. आधी या शोचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी करत होती. आता अभिनेत्री रसिका सुनील या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. रसिकाने नुकतंच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली.

स्पृहाऐवजी रसिका सुनील या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. स्पृहाबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने भाष्य केलं. ती म्हणाली, "मी 'सूर नवा ध्यास नवा'साठी हो म्हटलं तेव्हा असं काही होईल हे माझ्या डोक्यातही नव्हतं. इतका छान शो मिळाल्याने माझी उत्सुकता वाढली होती. एवढंच माझ्या डोक्यात होतं. पण आता प्रेक्षकांचं स्पृहालं मिळणारं प्रेम पाहून मला वाटतं मला तिच्याशी बोललं पाहिजे." 

"तिच्याकडून टिप्स घ्यायला मला आवडतील. यासाठी मला तिच्याशी बोलण्याची गरज आहे. मी अजूनपर्यंत तिला संपर्क साधलेला नाही. पण, लवकरच तिच्याशी बोलेन," असंही रसिका म्हणाली. दरम्यान, ७ ऑक्टोबरपासून 'सूर नवा ध्यास नवा'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अवधूत गुप्ते आणि महेश काळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.  

टॅग्स :सूर नवा ध्यास नवारसिका सुनिलमराठी अभिनेता