Join us  

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिच्या डोहाळ जेवणाचा फोटो, तिचा पती देखील आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 3:05 PM

आजकाल चित्रपटांप्रमाणेच मालिकांमधील कलाकार देखील तितकेच फेमस असतात. त्यामुळे सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांना आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींचे हजारो फॉलोअर्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

ठळक मुद्देअभिनेत्री रश्मी अनपटने कुलस्वामिनी या मालिकेत आरोहीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला होता.तिने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तिच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. कारण हा फोटो तिच्या डोहाळ जेवणातील असून तिच्यासोबत तिचा पती अमित खेडेकर देखील या फोटोत दिसत आहेत.अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर या चित्रपटात काम केले होते.

आपला आवडता कलाकार खऱ्या आय़ुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. त्यामुळे फॅन्स सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे सध्या सगळेच कलाकार सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहाण्यासाठी ते आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत असतात. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलत असतात.

आजकाल चित्रपटांप्रमाणेच मालिकांमधील कलाकार देखील तितकेच फेमस असतात. त्यामुळे सोशल मीडियामध्ये प्रेक्षक त्यांना आवर्जून फॉलो करतात. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींचे हजारो फॉलोअर्स असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अभिनेत्री रश्मी अनपटने कुलस्वामिनी या मालिकेत आरोहीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. पण तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत नेहमीच गप्पा मारत असते. रश्मी ही प्रेक्षकांची लाडकी असल्याने तिला तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर तिला सोशल नेटवर्किंग साईटवर फॉलो करतात. तिने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तिच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. कारण हा फोटो तिच्या डोहाळ जेवणातील असून तिच्यासोबत तिचा पती अमित खेडेकर देखील या फोटोत दिसत आहेत. अमित हा देखील अभिनेता असून त्याने हृदयांतर या चित्रपटात काम केले होते. या तिच्या फोटोला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी कमेंटद्वारे त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

'कुलस्वामिनी' या मालिकेमुळे रश्मीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कारण ही मालिका सुरू होण्यापूर्वी रश्मीचे इन्स्टाग्रामवर ३२ हजार फॉलोअर्स होते. ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यांत रश्मीच्या फॉलोअर्स संख्येत प्रचंड वाढ झाली होती. ही संख्या ५५  हजारांपेक्षा जास्त झाली होती.

सध्या तर रश्मी अनपटचे इन्स्टाग्रामवर एक लाख ४८ हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. ती गरोदर असल्याचे देखील तिने इन्स्टाग्रामद्वारेच तिच्या चाहत्यांना सांगितले होते. 

टॅग्स :रेशम टिपणीस