सात वर्षांसाठी रणविजयने नाकारले ‘बिग बॉस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:31 IST
अभिनेता रणविजय सिंग हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी टीव्ही शो ‘रोडीज’ चा गेल्या १० वर्षांपासून होस्ट आहे. तो म्हणतो,‘ मी ‘बिग ...
सात वर्षांसाठी रणविजयने नाकारले ‘बिग बॉस’
अभिनेता रणविजय सिंग हा अॅडव्हेंचर रिअॅलिटी टीव्ही शो ‘रोडीज’ चा गेल्या १० वर्षांपासून होस्ट आहे. तो म्हणतो,‘ मी ‘बिग बॉस’ चा केव्हाच सदस्य नव्हतो. बिग बॉस चा माझ्यावर कधीही परिणाम झाला नाही. मी सध्या शो आणि वेब सीरिज तयार करतो आहे. माझ्याकडे बिग बॉस साठी वेळच नाही. मला सात वर्षांसाठी बिग बॉसची आॅफर देण्यात आली होती. प्रत्येक वर्षी मी नाकारायचो. बहुतेक शो च्या निर्मात्या टीमला याची जाणीव झाली की, मी शो मध्ये काम क रण्यास उत्सुक नाही. मी विवाहित व्यक्ती असून मला या सर्व गोष्टींचे काहीच आकर्षण नाही. रोडिज हा शो जेवढा मला आवडतो, तेवढा बिग बॉस आवडत नाही. अनेक हिंदी चित्रपट मी केले पण बिग बॉस सारखा शो करण्यास माझी मानसिकताच नाही.’