‘डान्स इंडिया डान्स’च्या सेटवर राणी मुखर्जीने व्यक्त केली ही इच्छा,जाणून तुम्हीही व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 13:34 IST
‘डान्स इंडिया डान्स’च्या येत्या शनिवारच्या भागात पाहा बॉलीवूडच्या अनभिषिक्त राणीला ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय नृत्यविषयक रिअॅलिटी ...
‘डान्स इंडिया डान्स’च्या सेटवर राणी मुखर्जीने व्यक्त केली ही इच्छा,जाणून तुम्हीही व्हाल हैराण!
‘डान्स इंडिया डान्स’च्या येत्या शनिवारच्या भागात पाहा बॉलीवूडच्या अनभिषिक्त राणीला ‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय नृत्यविषयक रिअॅलिटी कार्यक्रमातील स्पर्धकांच्या अप्रतिम नृत्यकौशल्याने देशातीलच नव्हे, तर परदेशातील प्रेक्षकांचे आठवड्यामागून आठवडे मनोरंजन केले आहे. हा कार्यक्रम आता आपल्या उपान्त्य फेरीच्या आठवड्यात पोहोचत असून त्यामुळे स्पर्धकांमधील स्पर्धा अतिशय अटीतटीची होत आहे.ग्रॅण्ड फिनालेत प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धक आपले सारे नृत्यकौशल्य पणाला लावीत असून परीक्षकांचीच नव्हे,तर लक्षावधी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. येत्या शनिवारी प्रेक्षकांना ‘बॉलिवूडची अनभिषिक्त राणी’ राणी मुखर्जी ही कार्यक्रमात सहभागी होत असून ती ‘हिचकी’ या आपल्या आगामी चित्रपटाच्याप्रसिध्दीसाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होत आहे.उपान्त्य फेरीतील जबरदस्त नृत्याविष्कार सादर केलेल्या दीपकच्या कामगिरीवर राणी मुखर्जी एकदम खुश झाली आणि तिने त्याची अधिक माहिती विचारली. दीपक हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहात असल्याचे समजताच राणीने त्याला विचारले की तो आपल्या बरोबर रोज जेवायला काय आणतो. खाण्यापिण्याची आवड असलेल्या राणीने यावेळी आपल्या चलते चलते या शाहरूख खानबरोबरच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळची एक आठवण सांगितली. तेव्हा ते महाराष्ट्रातील माळशेज घाटाजवळ चित्रीकरण करीत होते. राणी म्हणाली, “ते चित्रीकरण खूपच लांबलं होतं आणि आम्हाला तेव्हा त्या गावातच मुक्काम करावा लागला होता. त्या दिवशी मी आणि शाहरूख खान दिवसभर फक्त भाकरी आणि मिरचीचा ठेचा इतकंच खात होतो. पण ते पदार्थ फारच स्वादिष्ट लागल्याने आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. मला दीपकचा आजचा नृत्याविष्कार फारच आवडला आणि डान्स इंडिया डान्स हा असा मंच आहे की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जातं. ही स्पर्धा दीपकने जिंकावी, यासाठी मी स्वत: प्रार्थना करीन.” कार्यक्रमात राणीने आपल्या ‘हिचकी’ या आगामी चित्रपटाची माहिती दिली आणि अंतिम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी स्पर्धकांना तिने शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमात अंतिम सात स्पर्धकांनी सादर केलेला अप्रतिम नृत्याविष्कारही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दीपक हुलसुरेने ‘हवाएं’ या गाण्यावर केलेल्या दिलखेचक नृत्याने राणी मुखर्जी प्रभावित झाली आणि तिने त्याची विशेष प्रशंसाही केली. संकेतने ‘मेरे बिना’ गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने परीक्षक आणि ग्रॅण्डमास्टर हे चकित झाले. परंतु सचिन शर्माने सादर केलेल्या ‘तेरा चेहरा’ गाण्यावरील नृत्याने राणी मुखर्जीसह सर्वांची मने जिंकली आणि मंचावर एक वेगळेच वातावरण तयार झाले.एकंदरीतच राणी मुखर्जीच्या उपस्थितीमुळे ‘डान्स इंडिया डान्स’चा या वीकेण्डचा भाग निश्चितच रंजक असणार आहे.