'रंगा-पतंगा' नं केली तिकीटबारीवर धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 17:00 IST
छपडनेको मंगता’चं पालुपद सोबत घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘रंगा-पतंगा’ चित्रपटानं बॉक्स आॅफिसवर धमाल केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं ...
'रंगा-पतंगा' नं केली तिकीटबारीवर धमाल
छपडनेको मंगता’चं पालुपद सोबत घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘रंगा-पतंगा’ चित्रपटानं बॉक्स आॅफिसवर धमाल केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं २.३० कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे प्रेक्षक पसंतीची मोहोर चित्रपटावर उमटत असल्याचं स्पष्ट झालं आहे. फ्लाइंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर संस्था बिपीन शहा मोशन पिक्चर्सनं प्रस्तुत केला आहे. चित्रपटात या विदर्भातील एका मुस्लिम शेतकºयाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. आजूबाजूला भवताल बदलत असताना शेतकºयाला सोसाव्या लागणाºया समस्यांचे चित्रण हा चित्रपट करतो. नर्मविनोदी पद्धतीनं कथानक उलगडताना सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर आणि व्यवस्थेतील अनागोंदीवर हा चित्रपट मार्मिक पद्धतीनं भाष्य करतो. आतापर्यंत दुष्काळ, शेतकºयांचं जीवन, समस्या दाखवणारे अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात ‘रंगा-पतंगा’ वेगळा ठरला आहे. अमोल गोळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केलं आहे. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला आहे. अभिनेता नाना पाटेकर, जॉनी लिव्हर, सुनील पाल, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारख्या मान्यवरांसह सर्व माध्यमांतील समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. प्रथमच गंभीर भूमिकेत असलेले मकरंद अनासपुरे, संदीप पाठक यांच्या अभिनयाचं, कौशल इनामदार यांच्या संगीताचं, अमोल गोळेच्या छायाचित्रणाचं आणि प्रसाद नामजोशींच्या चुरचुरीत संवादांचं कौतुक होत आहे. सोशल मीडियात रंगा-पतंगाविषयी भरभरून लिहिलं जात आहे. चित्रपट पाहिलेले प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवत आहेत. रंगा-पतंगाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा परिणाम बॉक्स आॅफिसवरही दिसून येत आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं २.३० कोटींचा व्यवसाय केला आहे. येत्या काही दिवसांत ही कमाई वाढणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.