Join us  

'रंग माझा वेगळा'मधील दीपाला पडली 'चंद्रा'ची भुरळ, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 12:21 PM

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे(Reshma Shinde)चा सोशल मीडियावरील लेटेस्ट व्हिडीओ चर्चेत आला आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने निभावली आहे. या मालिकेत दीपाच्या भूमिकेतून रेश्मा शिंदे घराघरात पोहचली आहे. रेश्माचा खूप फॅन फॉलोव्हिंग असून त्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. रेश्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिचा इंस्टाग्रामवरील लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ती 'चंद्रमुखी' (Chandramukhi Movie) चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

अमृता खानविलकरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट चंद्रमुखी नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत आला होता. इतकेच नाही तर चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी हिट झाली होती. सोशल मीडियावर चंद्रमुखी चित्रपटातील बाई गं आणि चंद्रा या गाण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर बरेच रिल्स पाहायला मिळत आहे. हे गाणे सध्या ट्रेडिंग आहे. दरम्यान आता रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा उर्फ रेश्मा शिंदेला चंद्राची भुरळ पडली आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून लिहिले की, कारण हे ट्रेडिंग आहे. यावेळी तिने हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाउज परिधान केलेला दिसतो आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

रेश्मा शिंदे हिने रंग माझा वेगळा या मालिकेच्या आधी बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच ती हिंदी मालिकेतही झळकली आहे. याशिवाय ती लालबागची राणी सिनेमातून रुपेरी पडद्यावरही काम करताना दिसली आहे.

टॅग्स :रेश्मा शिंदेस्टार प्रवाहचंद्रमुखीअमृता खानविलकर