Join us  

पुण्या-मुंबईहून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकार कोल्हापुरात चित्रिकरणासाठी दाखल,राणादा आणि अंजलीबाई नव्या एपिसोडसह रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 6:00 AM

‘तुझ्यात जीव रंगला’मालिकेती सर्व कलाकारांची निगेटिव्ह आली आणि त्यांना नियमानुसार १० दिवस हॉटेलमध्ये तर ४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

लॉकडाऊननंतर महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगला सशर्त परवानगी  दिली आहे.सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पाळून या मालिकेचं चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. सेटवर मास्क सक्तीचे असून नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आता चित्रीकरण पार पडणार आहे. 

कोरोनाचं सावट संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर होतं. यामुळे जवळपास अडीच महिने मालिकेचे चित्रिकरण बंद होते. त्यामुळे गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या मालिका पाहायला मिळत नव्हत्या. पण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. 

पुढच्या आठवड्यात सर्वांचा आवडता राणादा आणि अंजलीबाई नव्या एपिसोडसह भेटायला येण्याची शक्यता आहे. यावेळेस पहिल्यांदा या मालिकेतील सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. ही टेस्ट मालिकेतील सर्व कलाकारांची निगेटिव्ह आली आणि त्यांना नियमानुसार १० दिवस हॉटेलमध्ये तर ४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. 

पुण्या-मुंबईहून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकार कोल्हापुरात चित्रिकरणासाठी दाखल झाले आहेत. यानंतर पुन्हा एकादा सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात येणार आहे. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. तसंच सेटवरही पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण सेट सॅनिटाइज करण्यात आला आहे. शूटिंगचे सर्व नियम मालिकेच्या टीमकडून पाळण्यात येत आहेत. सेटवरील प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक सॅनिटाइज करण्यात आला आहे.

 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला