Join us  

'अस्सल पाहुणे इसराल नमुने'मध्ये येणार रामदास आठवले आणि आनंद शिंदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:40 PM

रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

ठळक मुद्देआनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत

कलर्स मराठीवरीलअस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये नेते रामदास आठवले आणि गायक आनंद शिंदे यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. काही प्रश्नांची उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली. या गप्पा चांगल्याच रंगल्या. रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे. तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितले,त्यांना सभेमध्ये, पार्लमेंट मध्ये बसून कविता लिहिण्याची सवय आहे. रामदास आठवले यांना विचारले शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती त्यावर रामदासजी म्हणाले अमिताभ बच्चन यांची तर धर्मेंद्रची उद्धव ठाकरे आणि गब्बरची शरद पवार यांनी साकारली असती. आनंद शिंदे यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणाले “माझ्या बारश्याला माझ्या वडिलांनी मला १०,००० रुपयांवर झोपवले होते. मला लहान असताना कधीच वाटले नाही, गायक होईन मला वाटलं होतं कि, म्युन्सिपालटी मध्ये काम करेन. पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचे रक्त त्यामुळेच आज मी गायक आहे.

टॅग्स :अस्सल पाहुणे इसराल नमुनेमकरंद अनासपुरेकलर्स मराठी