Join us  

'त्या' ट्विटमुळे भडकले रामायणचे लक्ष्मण, रिहानासारख्या लोकांनी उगाच आमच्या देशात ढवळाढवळ करु नये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 1:03 PM

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपले मत मांडले आहे. रिहाना असो किंवा अन्य कोणी, त्यांना आमच्या देशीतील अंतर्गत बाबींमध्ये बोलण्याचा अधिकार नाहीय.हा आमच्या देशाचा प्रश्न आहे.

सध्या प्रत्येक भारतीयाच्या तोंडी पॉप स्टार रिहानाचं नाव आहे. रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. तिने ट्वीट केल्यापासून हा मुद्दा जगभरात चर्चिला जात आहे. फक्त रिहानाच नाही तर जगभरातील अनेक सेलिब्रिटी आता या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आणि सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनीही प्रोटेस्टच्या समर्थनार्थ ट्विट केलं आणि आता जगभरातील अनेक कार्यकर्तेही या संबंधी ट्वीट करत आहेत. त्याचवेळी भारतात रिहानाच्या ट्वीटवरून काही सेलिब्रिटींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर संतप्त टीका केली आहे. रामायण या पौराणिक मालिकेत 'लक्ष्मण' ची भूमिका साकारणारे अभिनेता सुनील लाहिरीनेही रिहानासा  जोरदार फटकारले आहे. 

ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपले मत मांडले आहे. रिहाना असो किंवा अन्य कोणी, त्यांना आमच्या देशीतील अंतर्गत बाबींमध्ये बोलण्याचा अधिकार नाहीय.हा आमच्या देशाचा प्रश्न आहे. आमच्या समस्या सोडवण्यासाठी पदरेशी लोकांची आम्हाला गरज नाही. आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. कोणत्याही परदेशी सेलिब्रेटी कोणीही सर्वसामान्यांनी यापासून दूरच राहावे उगाच ढवळाढवळ करु नये.

तसेच ग्रेटा थनबर्कने सोशल मीडियावर एक टुलकिट जारी केले होते त्यावरुन रिहानाला  शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १८ कोटी रुपये दिले गेल्याचा भांडोफोडही झाला होता. तिच्या या ट्विटमुळे खळबळ माजली होती. ही माहिती समोर येताच  बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतनेही रिहानाच्या शेतकऱ्यांविषयीच्या ट्विटनंतर हा सर्व रचून केलेला कट असल्याचं बोलत तिचा चांगलाच समाचार घेतला होता. 

प्रकाश राजने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा, ग्रेटा थनबर्गचे ट्वीट केले रि-ट्वीट

ग्रेटाने तिच्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, 'मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे. शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावना, धमक्या, मानवाधिकारांचं उल्लंघन ही गोष्ट बदलू शकत नाही,' असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं होते. आता ग्रेटाला प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश राजने ग्रेटाचे ट्वीट रि-ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला त्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :रिहानाशेतकरी आंदोलन