रमा - राजच्या सहजीवनाला मिळणार कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:42 IST
कलर्स मराठीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये रमा आणि राजचे लग्न झाल्यापासून रमाला कुलकर्णी घरातल्या सदस्यांचे विचार पटत ...
रमा - राजच्या सहजीवनाला मिळणार कलाटणी
कलर्स मराठीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये रमा आणि राजचे लग्न झाल्यापासून रमाला कुलकर्णी घरातल्या सदस्यांचे विचार पटत नाही कारण ती आजच्या काळातील मुलगी आहे. स्त्रीवर कुठल्याही प्रकारे होणारा अत्याचार तिला मान्य नाही. कुलकर्णींच्या घरातील चालीरीती आपल्याश्या करणे, त्यांच्या नियमांना पाळणे, त्यांचा परंपरावाद समजून घेणे रमाला अवघड होऊन बसले आहे. कारण, तिला स्वत:ची मते आहेत, विचार आहेत ज्याला कुलकर्णी यांच्या घरात मुळीच स्थान नाही. रमा आणि विभा, तसेच कुलकर्णी परिवार यांच्या विचारात असलेली तफावत खूपच मोठी असल्याने रमा या घरामध्ये रहाण्यास तयार नव्हती आणि तिने राजला आपण वेगळे राहू असे देखील सांगितले. परंतु यामध्ये विभा यांनीच सुवर्णमध्य काढला आणि रमा आणि राजला एक अट घातली ज्यानुसार त्यांनी रमाला दोन महिन्यांची मुदत दिली ज्यामध्ये एकतर त्यातरी बदलतील अथवा रमा बदलेल. विभाच्या या अटीमुळे रमा – राजचे भविष्य कसे बदलणार ? पुढे काय होणार ? याची उत्सुकता प्रेक्षकांना असणे स्वाभाविकच आहे. काही दिवसांपासून “कुंकू, टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत ज्यामध्ये महत्वाची म्हणजे विभाची दोन महिन्यांची अट रमाने स्वीकारली असून राज देखील खुश आहे. परंतु घरामध्ये स्त्रियांप्रती असलेला पुरूषांचा आणि घरातीलच स्त्रियांचा दृष्टीकोन रमाला मान्य नाही असे दिसून येत आहे. आणि या घरातील लोकांना त्यांच्या अनावश्यक नियमांना रमाने बदलण्याचा निश्चिय केला आहे. याच दरम्यान रमाची आई रमावर कुलकर्णी परिवाराकडून खूप अत्याचार होत आहेत, तिला स्वातंत्र्य नाही, तिच्यावर बळजबरी होत आहे, रमाला घरामध्ये डांबून ठेवले आहे, तिच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि पोशाखावर देखील बऱ्याच मर्यादा आहेत असे आरोप करते. ज्यावर रमा विभा आणि संपूर्ण परिवाराला मिडीयासमोर वाचवते आणि असे काहीही तिच्यासोबत या घरामध्ये घडत नसल्याचे सांगते आणि विभाताईना सुध्दा बास्केटबॉल आवडतो आणि त्यांना याबद्दल माहिती आहे असे देखील ती सगळ्यांना सांगते परंतु पहिले कोणालाच विश्वास बसत नाही नंतर जेव्हा विभा आपल्याला असलेली माहिती सर्वांसमोर मांडतात तेंव्हा सगळ्यांना विश्वास बसतो आणि आश्चर्य देखील वाटते.