Join us  

राम कपूरची लव्हस्टोरी; वाचा दीर-भावजयीची जोडी कशी अडकली विवाहबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 2:17 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा असलेल्या राम कपूरची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल अशीच आहे, वाचा सविस्तर!

गेल्या सप्टेंबर महिन्यात ४४ वर्षांचा झालेला अभिनेता राम कपूर याने त्याच्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेतून केली, पुढे त्याने मोठ्या पडद्यावरचा प्रवास सहज गाठला. त्याने यशाची ट्रेन अशी काही पकडली की, त्याने मागे वळून बघण्याची गरजच समजली नाही. होय, राम कपूरचा प्रवास हा खरोखरच धावत्या ट्रेनसारखा राहिला आहे. वास्तविक राम कपूर याला ‘कसम से’ या टीव्ही मालिकेत साकारलेल्या जय वालिया या भूमिकेने खºया अर्थाने ओळख मिळवून दिली. ही एकच मालिका नव्हे तर ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतूनही तो खूप फेमस झाला. परंतु तुम्हाला हे माहीत आहे काय की, या मालिकेत त्याच्या भावजयीची भूमिका साकारणाºया अभिनेत्रीबरोबरच त्याने लग्न केले? होय, या मालिकेदरम्यानच राम आणि त्याच्या भावजयीची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांच्यात प्रेम झाले. दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.  खरं तर नेहमीच मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्रचंड प्रेम करतो. गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. एका टीव्ही मालिकेदरम्यानच दोघांची भेट झाली होती. पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट २००० ते २००२ दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. दोघे या मालिकेत काम करीत होते. गौतमी रामच्या भावजयीची भूमिका साकारत होती. पुढे राम कपूरला मालिकेतील त्याच्या भावजयीवर प्रेम जडले. परंतु हे प्रकरण इथेच थांबले नव्हतो. कारण या दोघांच्या प्रेमात अडथळे येण्यास सुरुवात झाली.  जेव्हा रामने गौतमीला प्रपोज केले होते, तेव्हा तिने त्याला लगेचच होकार दिला होता. परंतु रामची ही लव्हस्टोरी त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते. गौतमीच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. तसेच गौतमीलादेखील रामने पार्टीत जाणे, ड्रिंक करणे पसंत नव्हते. या सर्व अडथळ्यांनंतर मालिकेतील हे दीर-भावजयी १४ फेब्रुवारी २००३ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विवाहबंधनात अडकले. या दाम्पत्याला दोन मुले असून, मुलगी सियाचा जन्म १२ जून २००६ रोजी झाला तर मुलगा अक्सचा जन्म १२ जानेवारी २००९ रोजी झाला.