Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंत दिसणार तिच्या पतीसोबत या कार्यक्रमात, अखेरीस लोकांना पाहायला मिळणार राखीचा नवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:16 IST

राखी सावंतचा नवरा रितेशला अजून कुणीच पाहिलेले नाही. पण आता राखी आणि तिचा नवरा एका कार्यक्रमात झळकणार आहे.

ठळक मुद्देराखी कोणत्या डान्स रिएलिटी शोचा भाग असणार हे अद्याप तरी तिने सांगितलेले नाहीये. पण नच बलियेे या कार्यक्रमात राखी आणि रितेश झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.  

राखी सावंतचा नवरा रितेश अद्याप जगासाठी एक रहस्य आहे. राखी सांगते की ती विवाहित आहे. तिचे रितेशसोबत लग्न झाले आहे पण तिच्याकडे रितेशसोबत कोणताच फोटो नाही आणि त्याला अजून कुणीच पाहिलेले नाही. बिग बॉसच्या घरात असताना राखी आणि त्याच्यात काही गैरसमज झाले असल्याची देखील चर्चा रंगली होती. पण आता राखी आणि तिचा नवरा एका कार्यक्रमात झळकणार आहे.

राखी आणि तिचा नवरा एका डान्स रिएलिटी शो मध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी राखीने देखील मीडियाशी बोलताना सांगितले आहे. राखीने सांगितले आहे की, रितेश आणि मला एका डान्स रिएलिटी शो साठी विचारण्यात आले आहे. हा डान्स रिएलिटी शो कोणता याबद्दल मी सध्या सांगू शकत नाही. पण आम्ही सध्या या शोच्या टीमसोबत चर्चा करत आहोत. रितेशच्या हाताखाली अनेक लोक काम करतात. त्यामुळे त्याला भारतात येऊन कार्यक्रमात भाग घ्यायचा असल्यास त्याच्या कामाचा विचार करावा लागेल. या कार्यक्रमाची ऑफर आम्ही स्वीकारल्यावर तीन ते चार महिने त्याला भारतातच राहावे लागणार आहे.

राखी कोणत्या डान्स रिएलिटी शोचा भाग असणार हे अद्याप तरी तिने सांगितलेले नाहीये. पण नच बलियेे या कार्यक्रमात राखी आणि रितेश झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :राखी सावंत