राकेश बापट आजारी असूनही करतोय मालिकेची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 16:03 IST
मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकर आजारी असेल तरीही त्याला शूटिंगसाठी सेटवर जावेच लागते. शूटि्ग थांबले तर त्याचे शेड्युल लांबत जाते त्यामुळे ...
राकेश बापट आजारी असूनही करतोय मालिकेची शूटिंग
मालिकेच्या शूटिंगदरम्यान कलाकर आजारी असेल तरीही त्याला शूटिंगसाठी सेटवर जावेच लागते. शूटि्ग थांबले तर त्याचे शेड्युल लांबत जाते त्यामुळे कितीही महत्त्वाचे काम असो शो मस्ट गो ऑन प्रमाणे कामाच व्यत्यय आणून चालत नाही. असाच काहीसा प्रकार घडतोय. 'बहू हमारी रजनी - कान्त' मालिकेच्या सेटवर.या मालिकेतील शानची भूमिका सकारणारा करण व्ही. ग्रोव्हरच्या जागी आलेल्या राकेश बापटने ही भूमिका अचूक केली असून आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविली आहे.केवळ इतकेच नव्हे,तर कितीही आजारी किंवा जखमी असला, तरी राकेशने आपली कामालाच महत्त्व दिले आहे.राकेश खूप आजारी आहे त्याला मलेरिया झाला आहे.मात्र तरीही तो मालिकेचा नायक असल्याने त्याने शूटिंग सुरू ठेवले आहे.काम भरपूर असल्यामुळे विश्रांतीसाठी घरीही बसणे शक्य होत नाही.त्यामुळे सेटवरच तो जाड ब्लँकेट गुंडाळून बसलेला असतो कारण तापामुळे त्याच्या शरीरात खूपच हुडहुडी भरते.त्याच्यामुळे आता मालिकेचा सेट म्हणजे एक छोटेखानी हॉस्पिटलच बनले आहे.सेटवर रोज एक डॉक्टर येऊन राकेशची तपासणी करतो आणि त्याला आवश्यक तो औषधाचा डोस देतो.मालिकेचा विद्यमान कथाभाग शान,रजनी आणि राम यांच्याभोवतीच फिरत असल्याने राकेशला सेटवर शूटिंग करणे आवश्यक आहे. परिणामी एका डॉक्टरला रोज सेटवर त्याच्या तपासणीसाठी आणले जाते.यासंदर्भात राकेशकडे विचारणा केली असता तो म्हणाला, “मालिकेच्या शूटिंगमध्ये कुठेहीअडथळा येऊ नये,म्हणून आम्हाला आजारी असतानाही चित्रीकरणासाठी उभं राहावंच लागतं.सुदैवाने माझी टीम खूपच सहकार्य करणारी आहे; माझे सहकलाकार हे तर माझे कुटुंबीयच बनले असून ते माझी विशेष काळजी घेतात.यातून पूर्ण बरा होऊन पूर्वीची ताकद मिळण्यासाठी काही काळ जाईल.तोपर्यंत हा सेट छोटेखानी हॉस्पिटल म्हणूनही वापरला जाईल, असं दिसतंय.”