Join us

रजनीश करणार टिव्ही शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 15:25 IST

        अभिनेता रजनीश दुग्गल अनेक हिंदी चित्रपटात आपल्याला दिसला होता. खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शो ...

 
       अभिनेता रजनीश दुग्गल अनेक हिंदी चित्रपटात आपल्याला दिसला होता. खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शो चा देखील तो विजेता  होता. आता पुन्हा रजनीश टिव्ही वर झळकणार असल्याचे समजतेय. परंतु तो मालिके मध्ये नाही तर एका मोठ्या टिव्ही शो मध्ये २०१७ च्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा शो एका मोठ्या टिव्ही वाहिनीवर प्रसारित होणार असल्याचे समजतेय. एवढेच नाही तर बाहुबली या चित्रपटा एवढा हा शो भव्य दिव्य होणार असल्याचे कळतेय. रजनीशने आजपर्यंत अनेक हॉरर, थ्रिलर चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक  रिअ‍ॅलिटी शो जिंकण्याचा अनुभव देखील त्याला आहे. आता तो या नवीन शो मध्ये काय धमाल करणार हे तर आपल्याला २०१७ मध्येच समजेल.