Join us  

राहुल वैद्यची लोकप्रियता इनकॅशन करण्याचा मेकअर्सचा प्रयत्न, 'खतरों के खिलाडी ११'साठी देण्यात आले सर्वाधिक मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:54 PM

अर्जुन बिजलानी, अभिनव शुक्ला, सनाया ईरानी, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, महक चहल, आस्था गिल आणि विशाल आदित्य सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत.

छोट्या पडद्यावरील 'खतरों के खिलाडी' या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता असते. दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं अकरावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची उत्कंठा रसिकांना लागली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची  नावं समोर आली आहेत. अर्जुन बिजलानी, अभिनव शुक्ला, सनाया ईरानी, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, महक चहल, आस्था गिल आणि विशाल आदित्य सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत.

 

यंदाच्या पर्वात सहभागी होणारं मराठमोळं नाव म्हणजे राहुल वैद्य. बिग बॉसमध्येही त्याने स्पर्धक म्हणून एंट्री केली होती. या शोचा तो रनअरअप ठरला. आता काळजाचे ठोके चुकवणारे स्टंट करताना  राहुल दिसणार आहे. राहुल वैद्यने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी तगडे मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस शोनंतर राहुल वैद्यची लोकप्रियता इनकॅशन करण्याचा मेकअर्सचा प्रयत्न असल्यामुळे राहुल वैद्यला ती रक्कमही देण्यात आली आहे. 

राहुलला प्रति एपिसोड १२ ते १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. जे इतर स्पर्धकांच्या तुलनेत खूप जास्त आहे. अशाप्रकारे राहुल वैद्या खतरों के खिलाडी ११ सिझनचा  सर्वाधिक महागडी कंटेस्टंट ठरला आहे.रुबीना दिलैकला देखील या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. पण तिने नकार दिला. सध्या राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार प्रचंड चर्चेत आहेत.

 

दोघेही येत्या जूनमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. लग्नाच्या तारखेवरुन राहुल वैद्यने अजूनतरी काही माहिती सांगितलेली नाही. सध्या दोघेही त्यांचा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. सतत त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असता. दोघांच्या फोटोंना चाहत्यांचीही प्रचंड पसंती मिळत असते. 

राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती.

 

अशाप्रकरे पहिल्यांच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत.

टॅग्स :राहुल वैद्यखतरों के खिलाडी