Join us  

राधिकाची भन्नाट Love story ! प्रेम होतं पण लग्न करायचं नव्हतं, तरीही अडकली लग्नबंधनात, जाणून घ्या तिच्या लग्नाचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 6:00 AM

अनिता दातेला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे.

माझ्या नव-याची बायको मालिकेतील राधिका म्हणजेच अनिता दातेने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 

अनिता दातेचा नवरा चिन्मय केळकर सुद्धा अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे. या दोघांचं शिक्षणही एकाच कॉलेजमध्ये झालं आहे. दिड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर अनिता आणि चिन्मय लग्नाच्या बेडीत अडकले. ललित केंद्रात असतानाच चिन्मय आणि अनिताची ओळख झाली होती. पण त्यावेळी केवळ ते फ्रेंड्स होते. पण एका नाटकाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सिगारेट्स या नाटकाच्या तालमीच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याची त्यांना जाणीव झाली. पण चिन्मयला लग्न करायचे नव्हते आणि त्याने ही गोष्ट स्पष्टपणे अनिताला सांगितली होती. त्यामुळे त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली. दीड वर्षं ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले. आता त्यांच्या लग्नाला अकरा वर्षांहून अधिक काळ झालेला आहे.

टॅग्स :अनिता दातेमाझ्या नवऱ्याची बायको