Join us  

बिग बॉसच्या फायनलला दिसली नाही पुष्कर जोगची पत्नी, जाणून घ्या काय होते कारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 4:24 PM

पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे फायनल नुकतेच झाले. मेघा धाडे या कार्यक्रमाची विजेती ठरली. या कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये पुष्कर जोग, मेघा धाडे आणि स्मिता गोंदकर असे तीन स्पर्धक होते. या सगळ्यात स्पर्धकांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमाच्या फिनालेला आवर्जून उपस्थिती लावली होती. पण या स्पर्धकाच्या कुटुंबियांमध्ये पुष्करचे कुटुंब प्रेक्षकांना पाहायला मिळाले नाही. पुष्करच्या फॅन्सनी फिनालेच्या दिवशी त्याच्या पत्नीला आणि मुलीला चांगलेच मिस केले.

पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते. जास्मीन फिनालेला का आली नाही याविषयी नुकतेच पुष्करने एका मुलाखतीत सांगितले आहे. पुष्कर सांगतो, माझी मुलगी ही केवळ सहा महिन्यांची आहे. तिला नुकत्याच काही लसी देण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे तिची तब्येत बरी नव्हती. तिला ताप देखील होता आणि त्यात फिनालेचे चित्रीकरण सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहाणार होते. त्यामुळे जास्मीनला तिला चित्रीकरणासाठी आणणे शक्य नव्हते आणि त्यामुळे जास्मीन आणि माझी मुलगी दोघेही फिनालेला येऊ शकले नाहीत. 

पुष्कर आणि सई लोकुर या दोघांमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात खूपच चांगली फ्रेंड्शिप झाली होती. ते दोघे एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत असत. पुष्की, गिव्ह मी अ हग हे तर चांगलेच गाजले होते. पुष्कर आणि सई यांच्या जवळकीमुळे त्याची पत्नी नाराज असल्यामुळे तिने फिनालेपासून दूर राहाणे पसंत केले होते अशी चर्चा मीडियात रंगली होती. पण पुष्करनेच हे सगळे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 

काही वर्षांपूर्वी पुष्कर आणि जास्मिन रेशीमगाठीत अडकले.  जास्मिनचा अभिनयाशी काहीही संबंध नसून ती एअर होस्टेस आहे. एका प्रवासातच या दोघांची लव्ह स्टोरी रंगली आणि दोघांनी जन्मोजन्मीचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांनी अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं.

टॅग्स :बिग बॉस मराठीपुष्कर जोगसई लोकूर