Join us

प्रिया-उमेशची फॅमिली ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 06:40 IST

   कलाकारांना त्यांच्या सिमेमांच्या बिझी शेड्युलमुळे फॅमिलीला पुरेसा वेळ देता येत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात वावरणारे हे कलाकार कधीतरी स्वत:साठी, फॅ

            कलाकारांना त्यांच्या सिमेमांच्या बिझी शेड्युलमुळे फॅमिलीला पुरेसा वेळ देता येत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात वावरणारे हे कलाकार कधीतरी स्वत:साठी, फॅमिलीसाठी निवांत वेळ काढुन लाँग हॉलिडेवर जातात अन फुल्ल टू धमाल करतात. अशीच धमाल सध्या मराठईतील रोमँटिक कपल प्रिया बापट अन उमेश कामत करीत आहेत. दोघांचीही मस्त फॅमिली ट्रीप सुरु असुन त्याचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत.             प्रिया अन उमेश हॉलिडेसाठी गेलेत ते थेट आॅस्ट्रेलियाला. दोघेही त्यांची ही फॅमिली ट्रीप  एंजॉय करीत आहेत. सायकलींग, हॉटेलिंग अन मस्त निसर्गाच्या सानिध्यात फिरुन एकमेकांसमवेत टाईम स्पेंड करताना दिसत आहेत.  सध्या ते दोघे सिडनीमध्ये असुन प्रिया म्हणतीये तुम्ही जगभरात कुढेही फिरलात तरी निसर्ग तुम्हाला कधीही सरप्राईज करु शकतो. असे म्हणुन तीने किआमा बीचवरचा एक व्हीडीओ अपलोड केला आहे. दोघांच्याही या फॅमिली ट्रीपला आपण हॅपी जर्नी म्हणुयात. }}}}