पूजा सावंतला लागले चॅम्पियनसचे वेड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:55 IST
डी.जे ब्राव्हो याच्या चॅम्पियनसच्या गाण्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये धूमाकूळ घातला होता. वेस्ट-इंडिज या टीमनेदेखील वर्ल्डकप जिंकल्यानंतर देखील चॅम्पियनस या ...
पूजा सावंतला लागले चॅम्पियनसचे वेड
डी.जे ब्राव्हो याच्या चॅम्पियनसच्या गाण्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये धूमाकूळ घातला होता. वेस्ट-इंडिज या टीमनेदेखील वर्ल्डकप जिंकल्यानंतर देखील चॅम्पियनस या गाण्यावर ठेका धरला होता. संपूर्ण जगभारात या गाण्याने धमाल उडवून दिली आहे. यू-टयूबवर देखील या गाण्याचे हिटस दिवसेदिवस वाढत चालले आहे. अशा या चॅम्पियन्स गाण्याच्या प्रेमात अभिनेत्री पूजा सावंत देखील पडलेली दिसत आहे. तिने नुकतेच सोशलमिडीयावर आपल्या बहिणींसोबत चॅम्पियनस या गाण्यावर डान्स करतानाचा डबस्मॅश अपलोड केला आहे. यामध्ये पूजाच्या बहिणीं आणि छोटी परी साशा देखील मस्त अंदाजात चॅम्पियन्सवर एॅन्जॉय करताना दिसत आहे. तर चॅम्पियन्स या गाण्याच्या स्टेपवर देखील या बहिणींनी मिळून फूल कल्ला केलेला दिसत आहे. अशा या चॅम्यिनस गाण्याचे वेड पूजा सावंतला बरोबर तिच्या बहिणींना देखील लागलेले दिसत आहे.