Join us  

पियुष सहदेव भूमिकेसाठी घेतोय इतकी मेहनत,घोडेस्वारी शिकण्यात आहे बिझी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:30 PM

भूमिकेसाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या भूमिकेला साजेशा लूक करण्यापासून ते शरिरयष्टी बनवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर कलाकारांना लक्ष ठेवावे लागते.म्हणूनच या कलाकारांनी त्यांच्या भूमिका खात्रीशीर आणि अस्सल वाटाव्यात अशा साकारण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही.

दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली मोगलांचा अनभिषिक्त राजकुमार सलीम आणि सुंदर  अनारकलीची प्रेमकथा चिरंतन प्रेम कथा पुन्हा साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या शो मध्ये शाहीर शेख(सलीम) आणि सोनारिका भदोरिया (अनारकली) प्रमुख भूमिकेत आहेत तसेच त्यात नामवंत कलाकार सुध्दा प्रमुख भूमिकेत आहेत जसे की शाहबाज खान (अकबर), गुरदीप कोहली पंज (जोधा), अरूणा ईराणी (हमिदा) आणि पियुष सहदेव (अबुल फझल).  

भूमिकेसाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. आपल्या भूमिकेला साजेशा लूक करण्यापासून ते शरिरयष्टी बनवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवर कलाकारांना लक्ष ठेवावे लागते.म्हणूनच या कलाकारांनी त्यांच्या भूमिका खात्रीशीर आणि अस्सल वाटाव्यात अशा साकारण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही, मग ते त्यांचे संवादफेक सुधारण्यासाठी कार्यशाळेला जाणे असो किंवा हा पिरियड ड्रामा अस्सल होण्यासाठी पोशाख घालून नक्कल करणे असो. भूमिकेविषयी पियुष सहदेव म्हणाला की, “मला सांगीतले होते की त्यात एक महत्वाचा सीन घोड्यावर स्वार होण्याचा असणार आहे आणि तो मला साकारायचा आहे. मी याआधी घोघेस्वारी कधीच केली नव्हती, त्यामुळे हे माझ्यासाठी आव्हानच होते, पण मी ते स्विकारण्याचा निर्णय घेतला. 

मी फक्त 4 दिवसांच्या कालावधीत हे कौशल्य शिकलो आहे आणि हा सीन साकारताना मला खूप मजा आली. अबुल फझल हा एक क्रूर योध्दा होता तसेच एक प्रख्यात कवी सुध्दा होता, त्याने ऐन-ए-अकबरी लिहीली आहे. माझ्या मते अनेक छटा असलेले हे पात्र साकारण्यासाठी मी माझे वजन 10 किलोने वाढविले आहे. इतिहासातील या चिरंतन प्रेमकथेच्या नवीन अवताराला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची मला आता उत्सुकता असल्याचे पियुष सांगतो.

सलीमची भूमिका साकारणारा शाहीर शेख म्हणाला, “सलीमची भूमिका करणे हे अभिनेत्यांचे स्वप्न असते. मला वाटते की या पात्राचे स्तर आणि वेदना साकारणे हे जास्त अवघड आहे. तो एक अतिशय क्लिष्ट व्यक्तिमत्वाचा होता आणि त्यामुळे ते इतके सोपे नाही- पण म्हणूनच मला ही भूमिका आवडली. निर्मात्यांनी तो लुक आणि सेट अतिसय छान केले आहेत आणि आम्हाला आशा आहे की आम्ही या पात्रांना न्याय देऊ शकू. एक टिव्ही अभिनेता असल्यामुळे आम्हाला पर्याय खूप कमी असतात आणि सलीमची विख्यात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे.” 

अनारकली साकारणारी सोनारिका भदोरिया म्हणाली, “युवराज सलीम आणि कनीज अनारकली यांच्या अमर्त्य प्रेमाची गाथा असलेला हा शो आहे. नियम आणि समाजाची बंधने तोडून प्रेमाला प्राधान्य देणारा संदेश यात दिलेला आहे. अनारकली सारखे सशक्त पात्र साकारताना त्या भोवती खूप गूढतेचे वलय असते. हे पात्र बारकाईने साकारण्यासाठी मी कथकचे धडे गिरवत आहे.”

टॅग्स :पियुष सहदेवदास्तान-ए-मोहब्बत