Join us  

'जीव झाला येडापिसा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि सिद्धी जोडीनं करणार सत्यनारायणाची पूजा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:12 AM

गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि सिद्धीचे पात्र साकारणारी विदुला चौघुले यांनी आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

'जीव झाला येडापिसा' मालिकेच्या कथेची मांडणी, चित्रीकरण, मालिकेतील पात्र, रिअल लोकेशन्स यामुळे जीव झाला येडापिसा ही मालिका प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलीशी आणि वास्तवादी वाटते आहे. चिन्मयी सुमित साकारत असलेले आत्याबाईचे पात्र, शिवाच्या वडिलांची भूमिका साकारणारे मोहन जोशी, आणि मालिकेतील इतर पात्र ते साकारत असलेल्या भूमिका अप्रतिमरित्या पार पाडत आहेत. गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळदेसाई आणि सिद्धीचे पात्र साकारणारी विदुला चौघुले यांनी आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

आता जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिद्धी घरातल्यांना निक्षून सांगते शिवासाठी वटपौर्णिमेचे व्रत करणार नाही. पण नंतर सिद्धी मनाविरुध्द जाऊन आत्याबाईना दिलेल्या शब्दाखातर वटपौर्णिमाची पूजा करण्यास तयार होते. ज्यामध्ये सिद्धीला अचानक चक्कर येते. शिवा तिला आधार देतो, तिला उचलून घेतो आणि फेरे पूर्ण करतो. शिवा आणि सिद्धीच्या नात्यामध्ये विश्वास, प्रेम नाही. दोघे एकमेकांना साथीदार म्हणून स्वीकारतील हे अवघडच. पण, सिद्धीच्या मनामध्ये शिवाच्या वडिलांबद्दल आदर - आपुलकी आहे आणि त्यांच्या म्हणण्यामुळेच ती त्या घरामध्ये अजुनही आहे असे देखील ती घरच्यांना सांगते. घरामध्ये सत्य नारायणाची पूजा करण्याचा निश्चय यशवंत यांनी केला आहे आणि त्यांची इच्छा व्यक्त केली कि, शिवा आणि सिद्धीने त्या पुजेस बसावे. आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी सत्यनारायणाची पूजा करणार आहेत. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर, पैंजण यामध्ये सिद्धी खूपच सुंदर दिसत आहे.  

टॅग्स :कलर्स मराठी