Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर थिरकली रूपेरी वाळूत... या गाण्यावर, पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:07 IST

समृद्धीचा या गाण्यातील डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण त्याचसोबत या गाण्यातील तिच्या अदांची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देसमृद्धी ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली डान्सरदेखील आहे.

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. शुभम, किर्ती, जीजी अक्का ही पात्रं तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहेत. या मालिकेत किर्तीच्या भूमिकेत आपल्याला समृद्धी केळकरला पाहायला मिळत असून तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

समृद्धी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती आपल्याला रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

समृद्धीचा या गाण्यातील डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण त्याचसोबत या गाण्यातील तिच्या अदांची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच मालिकेत नेहमीच साडीत दिसणारी समृद्धी या व्हिडिओत एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. तुझ्या डान्ससोबतच तुझे हे मॉर्डन रूप आम्हाला आवडले असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. 

समृद्धी ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली डान्सरदेखील आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकारात पदवी संपादन केली आहे. लॉकडाऊन काळात समृद्धीने अनेक मुलांना नृत्य शिकवले होते.

टॅग्स :स्टार प्रवाह