Join us

‘गुलाम’च्या सेटवर परमसिंहचे ‘मौन’व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 15:29 IST

कधी कधी अभिनेते आपल्या भूमिकेत इतके शिरतात, की त्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचीही गरज असते,याचे भानही ते विसरतात.‘गुलाम’ या वैशिष्ट्य़पूर्ण ...

कधी कधी अभिनेते आपल्या भूमिकेत इतके शिरतात, की त्यांनी स्वत:ची काळजी घेण्याचीही गरज असते,याचे भानही ते विसरतात.‘गुलाम’ या वैशिष्ट्य़पूर्ण मालिकेत ‘गुलाम’ रंगीलाची भूमिका साकारणारा परमसिंह आता त्याचे मालक चौधरी वीरसिंह व त्याच्या कुटुंबियांविरोधात बंड पुकरला आहे.आतापर्यंत रंगीला हा वीरचा निष्ठावंत गुलाम होता; परंतु आता रंगीलाने आपल्या मालकाच्या कृष्णकृत्यांविरोधात आपला आवाज उठविला आहे. आपला मालक वीर याने आपल्या आईविरोधात केलेल्या गैरवर्तनामुळे संतापलेला रंगीला त्याच्यावर ओरडतो, असा एक प्रसंग परमसिंहमने नुकताच साकारला. आपल्या भूमिकेत शिरून ती पूर्णपणे समर्पित भावनेने रंगविण्याबद्दल विख्यात असलेल्या परमसिंहने हा प्रसंगही तितक्याच तन्मयतेने साकार केला. तो वीरच्या अंगावर इतक्या जोरात ओरडला की नंतर काही काळ त्याच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता.हा प्रसंग प्रत्यक्षात उत्तमरीत्या उभा राहिला, तरी त्यासाठी परमसिंहला आपल्या आवाजाची किंमत चुकवावी लागली.या घटनेविषयी नंतर परमसिंह म्हणाला, “या प्रसंगात इतक्या विविध भावना गुंफलेल्या होत्या की त्यामुळे मला तो प्रसंग साकार करणं फारच महत्त्वाचं वाटलं. रंगीलाच्या त्या किंकाळीत केवळ संताप नव्हता, तर एक प्रकारची असहाय्यता होती, मन विदीर्ण करणारी आणि निराशा निर्माण करणारी भावनाही होती. हो, या घटनेनंतर काही काळ मला बोलता येत नव्हतं. पण आता मी सेटवर सर्वांशी अगदी हळू आवाजात बोलतो आणि माझे संवादही तसेच बोलतो.”25 व्या वर्षी 'परवरिश -कुछ खट्टी, कुठ मिठी  ही 'माझी पहिली मालिका मिळाली आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही. रोज सकाळी मी 6.00 वाजता उठतो आणि त्या दिवशी माझा सर्वोत्तम अभिनय करण्याच्या इच्छेने प्रेरित होतो.”असे तो सांगतो.विशेष म्हणजे परम हा अर्थशास्त्र विषयात  पदवीधर असूनही अभियक्षेत्रालाच आपले करिअर म्हणून निवडेल. त्याला अभिनय करण्यातच पूर्ण समाधान मिळतं.