'खिचडी' मालिकेत परेश रावलची एंट्री, साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 16:51 IST
'ओ माय गॉड' सिनेमात परेश रावलने साकारलेली कानजी लालजी मेहताची व्यक्तीरेखा चांगलीच भाव खावून गेली.यांत देवाविरोधातच खटला ठोकण्यात येतो... ...
'खिचडी' मालिकेत परेश रावलची एंट्री, साकारणार ही भूमिका
'ओ माय गॉड' सिनेमात परेश रावलने साकारलेली कानजी लालजी मेहताची व्यक्तीरेखा चांगलीच भाव खावून गेली.यांत देवाविरोधातच खटला ठोकण्यात येतो... आपल्या नाटकातल्या एका व्यक्तीरेखेला साकारताना परेश रावलनं आपल्या अभिनयानं यांत नवा प्राण ओतला.आता यानंतर परेश रावलचा असाच कॉमेडी अंदाज लोकप्रिय मालिका खिचडीमध्येही पाहायला मिळणार आहे.तसेच अनेक सिनेमा आणि यांत 'हेराफेरी' या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल कारण आजही हा चित्चिरपट पाहाताना रसिकांना मनोरंजनाची ट्रीट मिळाल्यासारखे वाटते. सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार विजेता परेश यांना आपले काम आणि मनोरंजन उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी हलचल, हंगामा, अतिथी तुम कब जाओगे?, आंखे आणि अशाच अनेक चित्रपटांमधून कामे केली आहेत.खिचडीमधील त्यांच्या अतिथी उपस्थितीमुळे प्रेक्षकांना १ तासाच्या गुदगुल्या करणाऱ्या विनोदासोबत पारेख परिवाराशी जोडलेल्या सगळ्या आठवणींशी परत एकदा जोडले जाण्याची संधी मिळेल.२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक, जे. डी. मजेठिया तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सुप्रिया पाठक यांनी आजवर 'कलयुग', 'विजेता', 'सरकार', 'ऑल इज वेल', 'गलियों की रासलीला राम लीला' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.ही कॉमेडी मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार आहे.नव्या स्वरूपातील खिचडीत वंदना पाठक, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, अनंग देसाई हे मूळ मालिकेतील कलाकार कायमच राहणार असल्याने पोट दुखेपर्यंत प्रेक्षकांची हसवणूक करण्यासाठी ही मालिका सिध्द झाली आहे.