Join us  

'डीआयडी 6'चा स्पर्धक परमदीप सिंगने दिले सरोज खान यांना कंटटेंम्पररी डान्स प्रकाराचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 10:57 AM

झी टिव्हीचा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स सीझन ६ ने त्याच्या असाधारण १८ स्पर्धकांच्या सुपरलेटिव्ह टॅलेंटने प्रेक्षकांचे ...

झी टिव्हीचा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स सीझन ६ ने त्याच्या असाधारण १८ स्पर्धकांच्या सुपरलेटिव्ह टॅलेंटने प्रेक्षकांचे मने काबीज केली आहेत. या सीझनला नामवंत चॅलेंजर्स आणि इंडस्ट्रीतील तज्ञ मंडळी येऊन शोची शोभा वाढविणार आहे आणि स्पर्धकांकडे आव्हानांचे गोळे फेकणार आहेत.डीआयडी ६च्या आगामी एपिसोड मध्ये डान्स गुरू आणि कोरियोग्राफर सरोज खान शोवर येणार आहेत. त्या स्पर्धकांच्या डान्सिंगचे कौशल्याची चाचणी त्रिनौती-तीन चुनौती आव्हानातून करणार आहेत, त्यात स्पर्धकांचे भावना दर्शविणे, नाट्य आणि भ्रामकता या तीन पॅरामीटर मधून परीक्षण केले जाणार आहे.सरोजजी यांना प्रभावित करण्यासाठी स्पर्धक त्यांची कामगिरी जीव ओतून करत असताना,मुदस्सर की मंडली मधील मुंबईचा परमदीप सिंग त्याच्या टटेंम्पररी डान्स शैलीने सरोजजींना मंत्रमुग्ध करून सोडले होते. यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराचा वापर जेवढा कराल तेवढाच बोटांचा वापर करून डान्स केला जातो. त्यांनी नंतर त्याला टटेंम्पररी जलद आणि संथ गतीने करून दाखविण्याचे आव्हान दिले होते.त्याच्या डान्सने प्रभावित झालेल्या सरोजजी म्हणाल्या,“परमदीप मी तुझ्या डान्स विषयी खूप काही ऐकले होते. हा प्रकार अतिशय वेगळा आहे आणि मला तो मंचावर येऊन तुझ्याकडून शिकणे अतिशय आवडेल.”मनोरंजनाचा घटक अजून उंचावर नेत सरोजजी आणि परमदीप त्यांच्या 'अखियाँ मिलाऊ कभी अखियाँ चुराऊ' या लोकप्रिय गाण्याच्या तालावर काही मूव्हज केल्या. सरोजजींना उद्देशून ग्रँड मास्टर मिथुन दा म्हणाले, “ मास्टरजी, टटिंग आणि डिजीटिंग हे डान्सचे प्रकार अगदी वेगळे आहेत पण तुम्ही सुध्दा अनेक प्रकारे वेगळ्या आहात आणि तुमच्या सारखी दुसरी कोणी नाही.” या वीकेंडला,प्रेक्षकांना अनेक हलकेफुलके क्षण पहायला मिळणार आहेत तसेच 'डान्स इंडिया डान्स ६'च्या स्पर्धकांचे श्वास रोखून धरणारे असाधारण परफॉर्मन्सेस सुध्दा पहायला मिळणार आहेत.'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन हिट झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.इतर सिझनप्रमाणे 6व्या सिझनला रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे. भारतातील विविध शहरात या शोसाठी ऑडिशन घेतले गेले होते. यावेळी निवडक स्पर्धकांना या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.आता शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आपले एकसे बढकर एक परफॉर्मन्स देत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत.प्रसिद्ध कोरियोग्राफर, मर्जी पेस्टनजी आणि मुदस्सर खान या कार्यक्रमाच्या परीक्षक पॅनेलमध्ये  आहेत. त्याचसोबत कोरियोग्राफर मिनी प्रधानही या शोला जज करत आहेत.