Join us  

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत परम सिंह दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:42 PM

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये आता लीप घेतला जाणार असून त्यात नव्या व्यक्तिरेखांचाही समावेश होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता वाढीस लागली आहे.

मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लसवर पाहायला मिळत असून या मालिकेत महिमा मखवाना, परस सिंग, रुक्सार रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये आता लीप घेतला जाणार असून मरियम खानची भूमिका अभिनेत्री महिमा मकवाणा साकारणार आहे. ती महिमाची एक अगदी नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा उभी करणार आहे. आपल्या अनेक भूमिकांमधून विविध व्यक्तिरेखांची वैशिष्ट्यपूर्ण रूपे आणि देहबोली उभी करण्यात महिमाचा हातखंडा आहे. मरियमची व्यक्तिरेखा साकारण्यास ती खूप उत्सुक आहे. लहानग्या मरियमचे जीवन मनजित या तरुणीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या नव्या कथानकात अभिनेता परमसिंह हा नायकाच्या भूमिकेत मालिकेत प्रवेश करणार आहे. परमसिंह प्रथमच एका गुन्हेगारी पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून तो मरियमच्या आयुष्याशी निगडित एका सत्याचा वेध घेताना दिसेल. आपल्या या नव्या भूमिकेवर प्रकाश टाकताना परमसिंह सांगतो, “या मालिकेची संकल्पनाच अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळेच मी या मालिकेतील ही भूमिका स्वीकारली. यात मी एका क्राइम रिपोर्टरची भूमिका रंगविणार आहे. शिवाय यातील माझी फवादची भूमिका ही मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. फवाद हा शांत आणि स्थिर मनाचा असून त्याचंही जीवन मरियमसारखंच आहे. ‘मरियम खान…’ मालिकेत ही भूमिका साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे; कारण कलाकाराला आपला अभिनय सुधारण्यासाठी फारच थोड्या भूमिका मदत करतात.”

मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेण्यात आल्यामुळे आता कथानकाला नवे वळण मिळणार असून त्यात नव्या व्यक्तिरेखांचाही समावेश होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता वाढीस लागली आहे. वैशिष्ट्यपूर्ण भूमिकाच साकारणारा परमसिंह उत्कृष्ट अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने आता तो एका नव्या भूमिकेतून पुन्हा आपला प्रभाव टाकण्यास सिद्ध झाला आहे.

परमसिंहची एंट्री ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’या मालिकेत लवकरच होणार असून ही मालिका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता ‘स्टार प्लस’वर प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. 

 

टॅग्स :मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह