Join us  

'जिजाजी छत पर है' मालिकेतल्या पंचमने गमावली आपली स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 9:30 PM

'जिजाजी छत पर है' या मालिकेच्या येत्या भागात मुरारीच्या रागापासून स्वतःला वाचवताना मुरारीची स्मृती गेल्याचे दिसणार आहे.

ठळक मुद्देमुरारीची स्मृती गेल्याचे दिसणारपंचमला वाचवण्यासाठी इलायची एक शक्कल लढवते

सोनी सबवरील 'जिजाजी छत पर है' या मालिकेने देशभरातील प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आहे. या मालिकेच्या येत्या भागात मुरारीच्या रागापासून स्वतःला वाचवताना मुरारीची स्मृती गेल्याचे दिसणार आहे. 

मुरारीने पंचमकडे मोठ्या विश्वासाने बँकेत ५०००० रुपये भरायला दिलेले असतात. मात्र, पंचम ते पैसे हरवतो आणि संकटात सापडतो. मुरारीच्या रागापासून पंचमला वाचवण्यासाठी इलायची एक शक्कल लढवते. ती पंचमला स्मृती गेल्याचा अभिनय करायला सांगते. परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि या सगळ्या गोंधळातून वाचण्यासाठी दुसरा मार्ग न सापडल्याने पंचम तिचा सल्ला ऐकतो. पंचमची स्मृती गेल्याचे मुरारीला कळते आणि त्यालाही फार वाईट वाटते. तो पंचमला पैशांबद्दलही काही विचारत नाही. या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये छोटे मुरारीला पंचमची स्मृती खरोखरच गेली आहे का ते चाचपण्यास सांगतो. पण इथेही इलायची संरक्षक बनून पुढे येते आणि आणखी एक गोंधळात पडण्यापासून ती पंचमला वाचवते. इलायचीला मदत करत असताना पंचमचा तोल जातो आणि तो गच्चीवरून खाली पडतो. आता मात्र त्याची स्मृती खरोखरच जाते. पंचमची भूमिका साकारत असणारे निखिल खुराना म्हणाले की, 'मुरारीचे पैसे हरवण्यापासून स्वतःची स्मृती जाण्यापर्यंतच्या अनेक घटना येत्या भागात घडणार आहेत, या भागामुळे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक होणार आहे.'

टॅग्स :जिजाजी छत पर है