Join us  

'जिजाजी छत पर हैं'मध्ये या ट्विस्‍टसह साजरा होणार व्हॅलेंटाईन्स डे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 4:58 PM

जिजाजी छत पर हैं' आपल्‍या आगामी व्‍हॅलेंटाइन्‍स ट्रॅकसह दर्शकांना आकर्षून घेण्‍याकरिता पूर्णपणे सज्‍ज आहे.

ठळक मुद्देइलायचीच्‍या डोक्‍यात एक वेगळीच आयडिया येते

सोनी सबची सर्वात लोकप्रिय मालिका ''जिजाजी छत पर हैं' आपल्‍या आगामी व्‍हॅलेंटाइन्‍स ट्रॅकसह दर्शकांना आकर्षून घेण्‍याकरिता पूर्णपणे सज्‍ज आहे. पंचम आता स्‍त्रीच्‍या रुपात नाही, तर त्‍याला आपली खरी ओळख मिळाली आहे. चांदनी चौक आता व्‍हॅलेंटाइन्‍स डे साजरा करण्‍याच्‍या मूडमध्‍ये आहे. 

इलायची (हिबा नवाब), पंचम (निखिल खुराना) सोबत व्‍हॅलेंटाइन्‍स डे साजरा करण्‍याकरिता उत्‍सुक आहे. तथापि, मुरारी (अनुप उपाध्‍याय) त्‍याला शॉपमधून एक दिवस सुट्टी देईल हे अगदी अशक्‍य आहे. पण, इलायचीच्‍या डोक्‍यात एक वेगळीच आयडिया येते. ती पंचमला अगदी साहसी व मजबूत व्‍यक्‍तीच्‍या रुपात दाखवते, जो इलायचीचा बॉडीगार्ड बनू शकतो आणि व्‍हॅलेंटाईन डेला इतर मुलांपासून तिचे रक्षण करु शकतो. अशाप्रकारे तो त्या दिवशी प्रत्‍यक्षपणे तिच्‍यासोबत राहू शकेल. यादरम्‍यान, भविष्‍यवाणीनुसार, करुणा (सोमा राठोड)ला एका वाईट घडामोडीला सामोरे जावे लागण्‍याची शंका आहे आणि ती तेव्‍हाच टळू शकेल, जेव्‍हा कुणीतरी तिला उचलून घेऊन चालेल. मुरारीने पंचमची ताकद पाहिली आहे आणि तो हे काम त्‍याच्‍याकडे सोपवतो आणि त्‍यामुळे पंचम आता घाबरुन जातो. पंचम करुणाला उचलून घेईल का की इलायची त्‍याला या कठीण स्थितीमधून वाचवेल?

पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, ''व्‍हॅलेंटाईन्‍स डे येऊन ठेपला आहे आणि चांदनी चौकात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. पण यामध्‍येही एक हास्‍यास्‍पद ट्विस्‍ट आहे. पंचमने आधी खूप ताकदवान असल्‍याचे नाटक केले आहे आणि आता तो करुणाला उचलून घेण्‍याच्‍या भितीने हादरला आहे. दर्शकांकरिता आता हे पाहणे रोचक असेल की, पुढे काय घडणार आहे.''

इलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ''इलायचीची अगदी मनापासून पंचमसोबत व्‍हॅलेंटाइन्‍स डे साजरा करण्‍याची इच्‍छा आहे आणि याकरिता ती काहीही करु शकते. तथापि, ती पुन्‍हा एकदा आपल्‍या योजनेमुळे पंचमला संकटात टाकते. दर्शकांना पुढील एपिसोड्स पाहायला खूप मजा येणार आहे, कारण संपूर्ण चांदनी चौक व्‍हॅलेंटाईन्‍स डेच्‍या मूडमध्‍ये आहे.''

टॅग्स :जिजाजी छत पर है