एक था राजा एक थी राणीच्या सेटवर साजरा केला गेला सरताज गिलचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 11:02 IST
सरताज गिल एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याचे काम प्रेक्षकांना ...
एक था राजा एक थी राणीच्या सेटवर साजरा केला गेला सरताज गिलचा वाढदिवस
सरताज गिल एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याचे काम प्रेक्षकांना खूपच आवडते. त्याचा नुकताच वाढदिवस झाला. त्याचा वाढदिवस त्याच्या मालिकेच्या टीमने धुमधडाक्यात साजरा केला. मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी मिळून सरजातला खूपच छान सरप्राईज दिले. यामुळे सरताज खूपच आनंदित झाला होता.मालिकेच्या टेलिकास्टची डेडलाइन जवळ असल्याने सगळे कामात व्यग्र असल्याचे सरताजला मालिकेच्या टीममधील सगळ्यांनी भासवले. सरताज सेटवर आल्यापासून कोणीच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्याचा वाढदिवस सगळे विसरले असल्याचे सगळ्यांनी मिळून नाटक केले. पण काही वेळानंतर मालिकेत राणीची प्रमुख भूमिका साकारणारी इशा जोरात सरप्राइज असे ओरडली आणि मालिकेच्या टीममधील मंडळींनी एक भला मोठा केक सरताजच्या समोर आणला. मालिकेतील सगळे कलाकार आणि क्रू मेंबरने मिळून सेटवर हा केक मागवला होता. कारण सरताज मालिकेच्या टीमचा खूपच लाडका आहे. सरताजचा वाढदिवस चांगला साजरा करण्यासाठी सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली होती. एवढेच नव्हे तर सेटवरील एक रूम मेणबत्ती, फुगे यांनी सजवली होती आणि त्यावर सगळ्यांनी त्याला वाढदिवसाचे संदेश लिहिले होते.याविषयी सरताज सांगतो, मी मालिकेच्या सेटवर आल्यावर कोणालाच माझा वाढदिवस लक्षात नाही असे सगळ्यांनी मला दाखवले होते. त्यामुळे मी खूप उदास झालो होतो. पण नंतर सगळ्यांनी मिळून मला खूपच चांगले सरप्राईज दिले. मी नेहमीच माझ्या मित्रांसोबत रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करतो. पण मला दुसऱ्या दिवशी दिवसभर चित्रीकरण करायचे असल्याने मी वाढदिवसाच्या दिवशी लवकर झोपलो. मात्र सेटवर माझा वाढदिवस माझ्या टीमने खूपच चांगला साजरा केला.