Join us

OMG:वाढत्या वजनामुळेच या अभिनेत्रीला सोडावी लागणार मालिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 11:38 IST

अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.त्यात कलाकारांना सुंदर दिसण्यासाठी  फिटनेस, डाएट करावे लागते. नित्यनियामाने ...

अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.त्यात कलाकारांना सुंदर दिसण्यासाठी  फिटनेस, डाएट करावे लागते. नित्यनियामाने या गोष्टी कलाकरांना कराव्यात लागताता. बॉलिवूडमध्ये सलमान खान आमिर खान यांनी त्यांच्या भूमिकेसाठी वजन घटवले, कमी केले असे उदाहरणे आहेत. स्वत:ला वेल मेंटेंन ठेवण्यातच कलाकारांचा जास्त कस लागत असतो. मात्र कधी कधी कितीही मेहनत केली तर प्रत्येक कलाकार हा फिट असतोच असे नाही. जे शरिराने जाडजुड असतील तर अशांना या इंडस्ट्रीत काही किंमतच नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे सतत कलाकार त्यांच्या खाण्यापिण्याकडे बारकाईने लक्ष देवून असतात. जेणे करून त्यांचे वजन वाढणार नाही. तसेच बॉलिवूड कलाकार असो किंवा टीव्ही कलाकार दोघांनाही भूमिकेप्रेमाणे स्वत:चा फिटनेस मेंटेन करावा लागतो. आता एका अभिनेत्रीला अशाच एका कारणामुळे चक्क मालिकाच सोडण्याची वेळ आली आहे. ते कारण म्हणजे तिचे वाढते वजन.होय, अभिनेत्री नेहा पेंडसेला चक्क तिच्या वाढत्या वजनामुळेच मे आय कम इन ही मालिका सोडावी लागणार असल्याची चर्चा रंगतायेत. या मालिकेता नेहा संजना नावाची मुख्य  भूमिका साकारत आहे. मालिकेतील संजना ही एका कंपनीची  ग्लॅमरस बॉस असते. त्या ऑफिसमध्ये काम करणारा साजन हा या संजनावर फिदा असतो. या कथेभोवती मालिका फिरते. मात्र दिवसेंदिवस नेहाचे वजन वाढत असल्यामुळे ती ग्लॅमरस दिसत नाही. मेटेंन दिसत नाही. असा मालिकेच्या निर्मांत्यांच म्हणणे आहे. नेहाचा निर्मात्यांसोबत 6 महिन्यांचा करारा शिल्लक आहे. नेहाने वजन कमी केले नाही तर निर्मात्यांनी नेहाला वॉर्निंग देताना करार पुढे वाढवणार नसल्याचे  कळतंय.त्यामुळे अभिनय क्षेत्रात फक्त ग्लॅमरलाच महत्त्व असल्याचे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे,