Join us

OMG !! ​युवीच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2016 18:23 IST

‘बिग बॉस’चे सीझन कुठलेही असो, ते वादळीच ठरणार. सध्या ‘बिग बॉस’चे दहावे सीझन सुरु आहे. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग ...

‘बिग बॉस’चे सीझन कुठलेही असो, ते वादळीच ठरणार. सध्या ‘बिग बॉस’चे दहावे सीझन सुरु आहे. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याची वहिनी आकांक्षा शर्मा या सीझनची स्पर्धक होती. रविवारी ती या सीझनमधून आऊट झाली. पण यानंतर एका मुलाखतीत आकांक्षा एक धक्कादायक खुलासा करू गेली. होय, युवराज ड्रग्स घेतो, असा धक्कादायक खुलासा तिने केला.मी माझ्या नव-यासह ड्रग्स घ्यायचे. तेव्हा युवराजनेच मला त्यालाही ड्रग्स घेण्याची सवय असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीमध्ये ड्रग्स घेणे ही कॉमन गोष्ट आहे, असे आकांक्षा म्हणाली. युवराजची आई म्हणजे स्वत:च्या सासूबाईवरही तिने अनेक आरोप केले.  स्वत:च्या बचावाकरिता माझ्या सासूबाई काहीही बोलत आहेत, असे ती म्हणाली. स्वत:च्या अपयशी  वैवाहिक आयुष्याविषयीही ती बोलली.  आमचा विवाह केवळ कागदोपत्री झाला होता. त्या नात्यात काहीच नव्हते. मी काहीच खोटं सांगितल नसून, मी काय बोलले आहे ते मला माहित आहे. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर आता काहीही बोलणे योग्य नाही, असे तिने सांगितले.२०१४ मध्ये आकांक्षाचे युवीच्या भावासोबत लग्न झाले होते. पण,  लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांमध्येच तिला जगण्यापेक्षा मरण्याचा मार्ग जास्त सोपा वाटू लागला. आकांक्षावर एक वेळ तर अशीही आली, जेव्हा तिला घर सोडून पळून जावेसे वाटत होते. पण कोणताही चुकीचा निर्णय न घेता आकांक्षाने या नात्यातून स्वत:ला वेगळे करत एकटे जगण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या सासरच्यांकडून काहीही नको आहे. मला फक्त जोरावरपासून घटस्फोट हवा आहे, असे आकांक्षा म्हणाली.