OMG:मोनिका कॅस्टेलिनो स्वतःला समजते 'श्रीदेवी'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 13:03 IST
‘हर मर्द का दर्द’ या मालिकेतील आपल्या भूमिकेचे खूप कौतुक होत असलेल्या मोनिका कॅस्टेलिनोची आज मै उपर आसमाँ निचे ...
OMG:मोनिका कॅस्टेलिनो स्वतःला समजते 'श्रीदेवी'?
‘हर मर्द का दर्द’ या मालिकेतील आपल्या भूमिकेचे खूप कौतुक होत असलेल्या मोनिका कॅस्टेलिनोची आज मै उपर आसमाँ निचे अशी परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.इतका कौतुकाचा वर्षाव होत असताना पाहून तिने चक्क स्वतःची तुलना श्रीदेवीशी केली आहे. मोनिका लवकरच छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत भूमिका साकारण्यासाठी तिने श्रीदेवीपासूनच प्रेरणा घेतली असल्याचे तिचे म्हणणे आहे.आपल्या मादक आणि आकर्षक सौदर्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुन्हा एकदा सज्ज झालेली मोनिका स्वत:ला श्रीदेवीच समजु लागली आहे अशाच चर्चाच रंगत आहेत.लवकरच मोनिका श्रीदेवीने नगिना सिनेमात साकारलेल्या भूमिकेप्रमाणेच भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या आगामी भागांत एका नृत्याच्या स्पर्धेत मोनिका नागिन नृत्य सादर करून आपल्या आवडत्या अभिनेत्रीला हा डान्स डेडीकेट करणार आहे.याविषयी मोनिकाकडे विचारणा केली असता ती म्हणाली, “या प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक तर होतेच मात्र थोडे दडपणही होते. नगीना चित्रपटातील श्रीदेवीची वेशभूषा मला नेहमीच आवडली असून मी लहान असताना तिच्यासारखे कपडे घालण्याचा प्रयत्न करत असे. आता ‘हर मर्द का दर्द’ या मालिकेतील भूमिकेद्वारे मला माझ्या या आवडत्या अभिनेत्री प्रमाणेच भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. आता रसिक माझा हा नृत्यप्रकार पाहून कशा प्रतिक्रीया देतील याकडेच माझे अर्ध लक्ष लागले आहे. या मालिकेत जुन्या कलाकरांच्या जागी फेमस चेह-यांना घेत नव्याने मालिकेची स्टारकास्टची टीम बनवली जात आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा फैझल रशीदची जागा हर्ष अरोराने घेतली आहे. आता हर्षद या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक परमित सेठीने मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. आगामी काळात कोणते नवीन कलाकार मालिकेत झळकतील है पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.