Join us  

ओजस्वी अरोरा दिसणार वेगळ्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 9:10 PM

बावले उतावले या मालिकेने गुड्डू (पारस अरोरा) आणि फंटी (शिवानी बदोनी) यांच्या वेड लावणाऱ्या आणि आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोनी सबच्याबावले उतावले या मालिकेने गुड्डू (पारस अरोरा) आणि फंटी (शिवानी बदोनी) यांच्या वेड लावणाऱ्या आणि आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गुफूच्या विस्फोटक प्रेमकहाणीच्या पुढच्या वळणावर एक भयानक आणि नवा रोमांचक कथा भाग बघायला मिळणार आहे.

सध्याच्या कथानकाला कलाटणी देण्यासाठी, प्रेक्षकांना अनोखी मेजवानी देण्यासाठी एक नवे पात्र येणार आहे ते म्हणजे पिंकी पटेल. अभिनेत्री ओजस्वी अरोराने ही भूमिका केली असून, पिंकी ही एक अस्सल गुजराती तरुण भूत आहे, जिचे तिचा नवरा गुल्लूवर वेड्यासारखे प्रेम आहे आणि तितकेच ‘पिंक’ रंगावरही. ती जिवंत असताना तिला सेल्फी काढण्याचे वेड होते त्यामुळेच ती जीव गमावून बसली. तेच सेल्फी काढण्याचे ध्येय घेऊन ती भूताच्या रूपात या कथानकात येत आहे. ओजस्वी अरोरा तिच्या गरब्याच्या प्रेमाने आणि वैशिष्ट्यपूर्ण हसण्यानेही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.त्यांच्या कौटुंबिक हनिमूनवरून परतल्यानंतर गुड्डूला एक पिंक रंगाचा फोन मिळतो आणि नकळतच त्याच्याकडून तो फोन सुरू केला जातो ज्यामुळे ‘बावली भूतनी’ म्हणजे पिंकी पटेल अॅक्टिव्हेट होते. आपला पती गुल्लू याच्यासोबत सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढताना मरण आलेली पिंकी तिच्या पतीला दुसऱ्या जगात घेऊन जाण्यासाठी आली आहे. गुल्लू आणि गुड्डू एकसारखेच दिसत असल्याने एकच गोंधळ निर्माण होतो. या सगळ्या गोंधळात, फंटी या परिस्थितीतून गुड्डूला वाचवू शकेल का?याबाबत ओजस्वी अरोरा म्हणाली,'बावले उतावले मालिकेच्या उत्कृष्ट टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच आनंददायी होता. मालिकेत काम करणारे सगळेच कलाकार खूप कष्ट घेत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी एका आनंदी गुजराती मुलगी पिंकी पटेलच्या भूताची भूमिका या मालिकेत करणारआहे, जिचा सगळ्यात वीक पाइंट आहे गरबा. मूड बदलल्यामुळे ती कोणत्याही क्षणी गरबा करायला लागते. ही भूमिका करताना मला खूपच मजा करता आली. प्रेक्षकांनाही ते पहायला मजा वाटेल अशी आशा करते.' 

टॅग्स :बावले उतावलेसोनी सब