Join us  

अरे वाह...! तेनाली रामा व तथाचार्य यांनी मारला पाणीपुरीवर ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 7:15 AM

सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिका तेनाली रामाने पौराणिक कथांच्‍या माध्‍यमातून तेनाली रामाची कथा त्‍याचे जीवन सादर केले आहे.

सोनी सबवरील सर्वात लोकप्रिय मालिका तेनाली रामाने पौराणिक कथांच्‍या माध्‍यमातून तेनाली रामाची कथा त्‍याचे जीवन सादर केले आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद व प्रेम मिळत आहे. ही मालिका दोन प्रसिद्ध शत्रूंना दाखवते, एक कृष्‍णा भारद्वाज साकारत असलेली भूमिका तेनाली रामा आणि दुसरी म्‍हणजे पंकज बेरी साकारत असलेली भूमिका तथाचार्य. या जोडीने नेहमीच त्‍यांच्‍या चतुर योजनांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मालिकेमध्‍ये तेनाली रामा व तथाचार्य यांच्‍यामध्‍ये नेहमीच भांडणे होत असतात. पण आपल्‍याला हे माहीत नाही की, पडद्यामागे ही स्थिती पूर्णत: वेगळी आहे. या नटखट जोडीला एक गोष्‍ट सर्वाधिक आवडते, ती म्‍हणजे आंबट गोड तिखट पानीपुरी. अहमदाबादच्‍या ट्रिपदरम्‍यान कृष्‍णा व पंकज हे पानीपुरीचा आस्‍वाद घेताना दिसून आले. त्‍यांनी अहमदाबादमध्‍ये विविध ठिकाणी असलेल्‍या या भारतीय स्‍ट्रीट स्‍नॅकच्‍या विविध स्‍वादांचा आस्‍वाद घेतला. या संस्‍मरणीय अनुभवामध्‍ये अधिक भर करत या जोडीने अहमदाबादमधील ताजे ताक आणि इतर स्‍ट्रीट फूडचा देखील आस्‍वाद घेतला.

त्‍यांचा हा अनुभव आणि पानीपुरीबाबतच्‍या विशेष आवडीबाबत विचारले असता कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाले, पंकजजी आणि मला पानीपुरी खूप आवडते. आम्‍ही प्रवासादरम्‍यान किमान एकदातरी पानीपुरीचा आस्‍वाद घेतो. शूटिंग करत असताना देखील आम्‍ही पानीपुरी खाण्‍यासाठी बाहेर जातो किंवा सेटवरच ऑर्डर करतो. नुकतेच अहमदाबादला भेट देताना मी एका स्‍टॉलवर स्‍वत: पानीपुरी तयार केली आणि पंकजजीना दिली. पण आमचे समाधान झाले नाही आणि आम्‍ही संध्‍याकाळी एअरपोर्टला जाताना पुन्‍हा एकदा अहमदाबादच्‍या स्‍वादिष्‍ट पाणीपुरीचा आस्‍वाद घेतला.

मसालेदार चटणी व इतर स्‍वादपूर्ण घटक असलेल्‍या पाणीपुरीच्‍या आवडीबाबत बोलताना पंकज बेरी म्‍हणाले,कृष्‍णा आणि मी एकत्र शूटिंग करत असताना आम्‍ही खूप मजा करतो. या मौजमजेमध्‍ये अधिक स्‍वादाची भर करण्‍यासाठी आम्‍ही पाणीपुरीचा आस्‍वाद घेतो. भारतभरातील आमच्‍या प्रमोशनल भेटींदरम्‍यान आम्‍ही २ ते ३ थांबे घेत पानीपुरीचा आस्‍वाद घेतला. आम्‍ही अहमदाबादच्‍या भेटीदरम्‍यान अनेक वेळा पाणीपुरीचा आस्‍वाद घेतला. आमचे चाहते तर अचंबित झाले की, १६व्‍या शतकातील त्‍यांच्‍या आवडत्‍या पात्रांना देखील पाणीपुरी आवडते.

टॅग्स :तेनाली रामासोनी सब