Join us  

हिंदी मालिकेत झळकणार गश्मीर महाजनी, त्यासाठी घेतोय इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 4:57 PM

अभिनेता गश्मीर महाजनी आता 'इमली' या हिंदी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत गश्मीर महाजनीसोबत आणि अभिनेत्री मयुरी देशमुखही झळकणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. अभिनेता गश्मीर महाजनीच्या  सांगायचं तर त्याने त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील कारकीर्दीची सुरूवात 2010 साली 'मुस्कुराके देख जरा' या चित्रपटातून केली आहे. मात्र या चित्रपटातून त्याला यश मिळाले नाही. मराठी मध्ये गश्मीर 'कॅरी ऑन मराठा', 'कान्हा', 'डोंगरी का राजा' आणि 'देऊळबंद' या चित्रपटात झळकला आहे. आपल्या अभिनयानं मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियताही वाढत गेली.

 

गश्मीर महाजनी आता 'इमली' या हिंदी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत  गश्मीर महाजनीसोबत आणि अभिनेत्री मयुरी देशमुखही झळकणार आहे. 

'खुलता खळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यावर काही महिन्यांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसलळा. महिन्यांपूर्वी पती आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केली. या दु:खातून स्वत:ला सावरण्याचा ती प्रयत्न करत आहे. दुःख सावरत मयुरी पुन्हा एकदा नव्यानं आयुष्याची सुरुवात करत आहे. 'खुलता खळी खुलेना' मालिकेनंतर तिनं कोणतीही मालिका केली नाही. आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.

 

खबरदार! मराठीत का बोलत नाहीस, असं म्हणणाऱ्यांना करेन ब्लॉक, मराठी अभिनेत्याने दिली वॉर्निंग

गश्मीर महाजनीने इंस्टाग्रामवर घरातील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून त्याने म्हटलंय होते की, मराठी माणूस आहेस तर मराठीत का बोलत नाहीस अशी कमेंट केली तर ब्लाॅक करुन टाकीन. माझं मराठीपण सिद्धं करायला मला प्रत्येक वेळी मराठीतच बोलायची गरज नाही. एक्सरसाइज, रोगप्रतिकार शक्ती वाढवा. घरी रहा आणि सुरक्षित रहा.

 

टॅग्स :गश्मिर महाजनी