आता कलाकारांनाही रविवारी सुटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 10:26 IST
दिवसभर चालणारं शूटिंग आणि महिनातले सर्वच दिवस काम, टीव्ही कलाकारांना याची चांगलीच सवय झाली आहे. मात्र या कलाकारांना दिलासा ...
आता कलाकारांनाही रविवारी सुटी
दिवसभर चालणारं शूटिंग आणि महिनातले सर्वच दिवस काम, टीव्ही कलाकारांना याची चांगलीच सवय झाली आहे. मात्र या कलाकारांना दिलासा देणारा एक निर्णय फॉईसने (फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉईज) जाहीर केला आहे.या निर्णयानुसार दर महिन्याच्या दुसºया रविवारी सक्तीची सुटी असेल. या निर्णयाने कलाकार आणि तंत्रज्ञ खूश झालेत. कामाच्या व्यापामुळे निर्माण होणाºया आरोग्याच्या समस्या, पुरेशी विश्रांती न मिळाल्याने होणारा कामावर परिणाम याचा विचार करून एक दिवस पूर्ण काम बंद राहून आराम मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे.