Join us

बॉलीवुडसारखी घराणेशाही मराठी इंडस्ट्रीत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:18 IST

           खान... कपुर... चोप्रा.. खन्ना... यांच्या घराणेशाहीचा औदा आजही बॉलीवुड इंडस्ट्रीज आहे. कपुर घराण्याचे नाव ...

           खान... कपुर... चोप्रा.. खन्ना... यांच्या घराणेशाहीचा औदा आजही बॉलीवुड इंडस्ट्रीज आहे. कपुर घराण्याचे नाव तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. पृथ्वीराज कपुर यांच्यापासुन सुरु झालेली ही परंपरा आता रणबीर कपुरने आपले स्थान या चंदेरी दुनियेत निर्माण करुन सुरु ठेवली आहे. सलमान खान, आमीर खान या खानांकडे तर १०० करोड बॉक्स आॅफिस कलेक्शन क्लब म्हणुनच पाहिले जाते. बॉलीवुडमध्ये जरी घरोशाहीचा दबदबा असला तरी मराठी चित्रपटसृष्टीत मात्र काही अपवाद सोडता, स्टार सन्स पहायला मिळाले नाहीत.          अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी ऐंशी-नव्वदच्या दशकात मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनय व विनोदाशैलीने अक्षरश: वेड लावले होते. त्याचकाळात महेश कोठारे यांनी त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याला माझा छकुला या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती.   मराठी चित्रपटसृष्टीला आता नवा तारा मिळणार अशा आशा त्यावेळी प्रेक्षकांमध्ये पल्लवीत झाल्या होत्या. आणि झालेही तसेच २०१० मध्ये वेड लावी जीवा या चित्रपटातून कोठारेंच्या पहिल्या पिढीचे आगमन मराठी चित्रपटसृष्टीत झाले.                 सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर हिने देखील २०१३ मध्ये एकुलती एक या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. सचिनचा एक विशिष्ठ चाहता वर्ग आजही आहे, आता त्यांची मुलगी या रेस मध्ये उतरली असुन पिळगावकरांची पुढची धुरा तिच्याच हातात आहे असं म्हणाव लागेल. एवढच नाही तर तिने बॉलीवुडमध्ये देखील आपला जम बसविण्यास सुरुवात केली असुन शाहरुख खानच्या एका आगामी चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळाली आहे.          रवींद्र महाजनी यांचा मुलगा, गश्मीर महाजनी याने २०१० साली मुस्कुराके देख जरा या हिंदि सिनेमातून डेब्यु केला. त्यानंतर त्याने  मराठीत कॅरी आॅन मराठा आणि देऊळ बंद या सिनेमातही अभिनय केला. तसेच रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव याने १९८५ साली अर्धांगीनी या सिनेमातून करिअरची सुरुवात केली. आजवर त्याने हिंदी-मराठी चित्रपटांतून अनेक विविधांगी भुमिका साकारुन वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.         अजिंक्य देव, आदिनाथ कोठारे, श्रिया पिळगावकर, गश्मीर महाजनी यासारखे काही अपवाद सोडले तर आपल्या मराठी इंडस्ट्रीत कलाकारांची नेक्ट जनरेशन काही पहायला मिळाली नाही. मराठी सिनेमातील बºयाच कलाकांची मुले ही विविध बिझनेस किंवा दुसºया क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी मुद्दाम स्वत:ला या झगमगाटापासुन दुर ठेवले असल्याचे दिसते.           अशोक सराफ यांनी त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याच्या नावाने  अनिकेत टेलिफिल्म हे प्रोडक्शन हाऊस सुरु केले. निवेदिता सराफ या त्याचे काम पाहतात. परंतू त्यांच्या मुलाचे दर्शन काही मोठ्या पडद्यावर अजुन तरी झाले नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची अभिनय व स्वानंदी ही दोन मुले आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळेल अशी आशा आपण करुयात.          नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याच्याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मल्हार लवकरच अभिनय क्षेत्रात येत असुन तो सिनेमा करित असल्याचे बोलले जात आहे. परंतू यावर नाना म्हणतात, मल्हारने राम गोपाल वर्मा यांना २६-११ या फिल्मसाठी असीस्ट केले आहे. आणि तो लवकरच मला माझ्या आगामी चित्रपटासाठी ज्यात मी लेखन, दिग्दर्शन व अभिनय करतोय यासाठी असीस्ट करेल. आता पाहुयात मल्हार अभिनय क्षेत्रात येतोय कि पडद्यामागे राहुनच पाटेकरांचे नाव रोशन करतोय.        नागेश भोसले यांचा मुलगा अमरेंद्र भोसले याने २०१५ मध्ये आलेल्या पन्हाळा या सिनेमातून सिनेमॅटोग्राफर म्हणुन सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: नागेश भोसले यांनीच केले होते. आपल्या मुलात जर कला असेल आणि त्याला अभिनय क्षेत्रात यायचे असेल तरच त्याने यावे. मी माझ्या मुलाला अभिनय कर किंवा सिनेमॅटोग्राफिमध्ये ये असे कधीच सांगितले नव्हते. तो सर्वस्वी त्याचा निर्णय होता, असे नागेश भोसले सांगतात.          बॉलीवुडमध्ये ज्याप्रमाणे, आजोबा, मुलगा, बहिण, भाऊ, असे एका फॅमिली मधले अनेकजण आपल्याया मोठ्या पडद्यावर पहायला मिळतात. परंतू मराठी इंडस्ट्रीत एक पिढी जरी इंडस्ट्रीत आली तरी फार मोठी गोष्ट असल्यासारखे वाटते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही असणे ही चांगलीच गोष्ट आहे. आज आपण याचे उदहारण हिंदी चित्रपटसृष्टीत पाहतो. अनेक चांगले स्टार अ‍ॅक्टर्स यामुळे आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे मराठीतही अभिनेत्यांची नेक्स्ट जनरेशन आणि घराणेशाही प्रेक्षकांना पहायला मिळतेय का याची प्रतिक्षा करुयात.