Join us  

'या' रिऑलिटी शोच्या फिनालेमध्ये परफॉर्म करणार नोरा फतेही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 7:15 AM

स्टारप्लसवरील लोकप्रिय रिॲलिटी शो डान्स प्लस ४ आपल्या फिनालेच्या तयारीत असून ह्या फिनालेमध्ये बॉलीवूडमधील कलाकार आपले डान्सिंग कौशल्य दाखवणार आहेत.

ठळक मुद्देदिलबर, कमरिया, नाह, मनोहारी आणि अशा अनेक गाण्यांवर ती परफॉर्म करणार आहे. 

स्टारप्लसवरील लोकप्रिय रिॲलिटी शो डान्स प्लस ४ आपल्या फिनालेच्या तयारीत असून ह्या फिनालेमध्ये बॉलीवूडमधील कलाकार आपले डान्सिंग कौशल्य दाखवणार आहेत. दिलबरमधील आपल्या नृत्याने लाखोंचे मन जिंकणाऱ्या नोरा फतेही या फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहे. दिलबर, कमरिया, नाह, मनोहारी आणि अशा अनेक गाण्यांवर ती परफॉर्म करणार आहे. नोरा जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात ‘दिलबर...दिलबर...’ या गाण्यावर थिरकली होती. 

लवकरच नोरा रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी 3'मध्ये दिसणार आहे.  या सिनेमात वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा लीड रोलमध्ये आहेत. सिनेमात श्रद्धा भारतीय डान्सरची भूमिका साकारणार आहे तर नोरा इंटरनॅशनल डान्सरच्या भूमिकेत दिसेल. सिनेमात प्रभु देवा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करणार आहे.

हा सिनेमा‘एबीसीडी3’ म्हणजेच रेमोच्या ‘एबीसीडी’ सीरिजचा तिसरा भाग असल्याचे मानले जात आहे. या सीरिजमधील साआधीचे दोन्ही सिनेमे रेमो डिसूजा यानेच दिग्दर्शित केले होते.  बड्या स्टारकास्टसोबतच ३ डी चित्रपट असल्याने याचे बजेटही मोठे असणार आहे.रेमोच्या या डान्स मुव्हीत आणखी काय काय एक्ससाईटींग पाहायला मिळते, ते बघूच. 

टॅग्स :नोरा फतेही