Join us  

नवेदिता सराफ म्हणतात, "अशी भूमिका साकारायला मिळणं खूप कठीण आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 7:15 AM

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद तर मिळतोच आहे पण त्याचसोबत निवेदिता सराफ साकारत असलेल्या आसावरी या व्यक्तिरेखेला देखील अफाट लोकप्रियता मिळतेय. नुकताच या मालिकेतील आई कुठे काय करते? हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. यातील संवाद आणि कलाकारांचा अभिनय खूपच कमालीचा असल्यामुळे हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे.

आसावरी या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेमुळे निवेदिता सराफ यांची त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील हि दुसरी इनिंग अगदी जोमात चालली आहे असं म्हणणं खोटं ठरणार नाही. याबद्दल बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "माझी दुसरी इनिंग खूप महत्त्वाची होती, कारण मला माझ्या आवडीप्रमाणे काम करण्याची संधी मिळत गेली. पैशांपक्षाही चांगलं काम करायला मिळतंय यातच समाधान होतं. सध्या 'अग्गं बाई सासूबाई' मालिकेमध्ये मी आसावरी कुलकर्णी ही जी भूमिका करतेय ती 'वाडा चिरेबंदी'च्या भूमिकेला तोडीस तोड आहे. कारण, आजच्या टीव्हीच्या विश्वात अशी भूमिका साकारायला मिळणं खूप कठीण आहे. सासू-सुनेच्या भांडणाच्या चौकटीतून बाहेर पडत, 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने मला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आणलं आहे. या वयात असं काम करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण, हि आसावरी अशा प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, जिला आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरु करायची आहे."

टॅग्स :निवेदिता सराफझी मराठी