Join us  

केवळ एका भूमिकेमुळे बदलले या अभिनेत्याचे आयुष्य, पाया पडण्यासाठी लोक लावयचे रांगा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 6:30 AM

या अभिनेत्याचा चा अभिनय, त्यांचे हास्य याच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते.

ठळक मुद्देश्रीकृष्ण या भूमिकेने नितिश भारद्वाज यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक धार्मिक मालिकांमध्ये काम केले. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. 

श्रीकृष्ण या भूमिकेचा विचार केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर केवळ एकच अभिनेता येतो. तो म्हणजे नितिश भारद्वाज... बी आर चोप्रा यांच्या महाभारतने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही मालिका सुरू असताना त्या काळात लोक घराच्या बाहेर देखील पडायचे नाहीत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेत नितिश भारद्वाज यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय, त्यांचे हास्य याच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या मालिकेनंतर नितिश यांना लोक कृष्ण मानून त्यांच्या पाया पडण्यासाठी रांगा लावत असत.

नितिश यांनी महाभारतानंतर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही प्रेक्षक त्यांना कृष्ण म्हणूनच ओळखतात. नितिश यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेचे तिकीट देखील देण्यात आले होते. नितिश जमशेदपूर येथून निवडून देखील आले आणि खासदार बनले. पण त्यांनी काहीच काळात राजकारणाला रामराम ठोकला.

नितिश यांनी आपल्या अभिनयकारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली होती. त्यानंतर ते रवी बासवानीसोबत हिंदी नाटकांमध्ये काम करू लागले. त्यांनी दूरदर्शनवर न्यूज अनाऊन्सरची नोकरी देखील केली आहे. त्यांनी 1987 ला खट्याळ सासू नाठाळ सून या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत एंट्री केली. त्यानंतर त्यांनी तृषाग्नी या हिंदी चित्रपटात काम केले. पण श्रीकृष्ण या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक धार्मिक मालिकांमध्ये काम केले. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. 

नितिश यांना धार्मिक मालिकांमध्ये प्रेक्षकांनी स्वीकारले असल्याने त्यांच्या इतर भूमिकांना प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी अलीकडच्या मोहोंजोजरो, केदारनाथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांनी पितृऋण या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.