Join us

नीया सोडणार जमाई राजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 11:16 IST

जमाई राजा ही मालिका 20 वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी पिढी पाहायला मिळणार आहे. ही ...

जमाई राजा ही मालिका 20 वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी पिढी पाहायला मिळणार आहे. ही मालिका ऑगस्टच्या दरम्यान लीप घेईल असे म्हटले जात आहे. सध्या या मालिकेत रवी दुबे आणि निया शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. पण लीपनंतर निया ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. लीपनंतर रवी रवीच्याच मुलाची भूमिका साकारणार असल्याने त्याला एक तरुण व्यक्तिरेखा पुन्हा एकदा साकारायला मिळणार आहे. पण नीयाला लीपनंतर रवीच्या आईची भूमिका साकारावी लागणार आहे. नियाला हे मान्य नसल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.