Join us  

'नमूने' मालिकेत होणार निरंजन आणि जोगिंदर सिंग या बालमित्रांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 4:47 PM

येत्या काही आठवड्यात जोगिंदर सिंग (सुशांत सिंग) हे पात्र या मालिकेत दाखल होणार आहे. अत्यंत निर्मळ मनाचा हा जोगिंदर, निरंजन अग्नीहोत्रीचा (कुणाल कुमार) बालमित्र असतो.

ठळक मुद्देअभिनेता सुशांत सिंगची 'नमुने' मालिकेत एन्ट्री

सोनी सब वाहिनीवर 'नमूने' ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे. पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या लेखकांच्या कथांमधला विनोद दर विकेण्डला प्रेक्षकांसमोर जिवंत करत आहेत. या मालिकेतले प्रत्येक पात्र वेगळे आहे. आपल्या दररोजच्या आयुष्यात आपल्याला भेटणाऱ्या माणसांचेच ते प्रतिबिंब आहे. येत्या काही आठवड्यात जोगिंदर सिंग (सुशांत सिंग) हे पात्र या मालिकेत दाखल होणार आहे. अत्यंत निर्मळ मनाचा हा जोगिंदर, निरंजन अग्नीहोत्रीचा (कुणाल कुमार) बालमित्र असतो.

पु. ल. देशपांडे यांच्या कथेनुसार, जोगिंदरने बबडू हे आपले खास व्यक्तिमत्व हुबेहुब आत्मसात केले आहे. एका खून प्रकरणात जोगिंदर सिंग फोगट याला पोलीस शोधत असतात. जोगिंदर मात्र लपण्यासाठी निरंजनच्या घराचा आसरा घेतो. जोगिंदर हा आपल्या बालपणीचा मित्र असून त्याच्यासोबत आपल्या बालपणीच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत हे निरंजनला जाणवते. या दोघांच्या लहानपणीची भांडणे, आठवणी आठवून निरंजनचे कुटुंबीयही जोगिंदरला आपलेसे करून घेतात. निरंजनच्या कुटुंबियांकडून मिळालेले प्रेम पाहून आपण आयुष्यभर ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, ते आपल्याला मिळाले, असे जोगिंदरला वाटू लागते. जोगिंदर सिंग खरोखर खुनी आहे का? निरंजनच्या घरी जोगिंदरला अटक करण्यासाठी पोलिस आल्यानंतर, निरंजनची प्रतिक्रिया काय असेल? हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.जोगिंदर सिंग हे पात्र साकारणारा सुशांत सिंग म्हणाला, 'लक्षवेधी लेखक पु. ल. देशपांडे यांच्या कथांवर आधारित असलेल्या नमूने या मालिकेत मला ही भूमिका मिळाली, हा माझा बहुमान आहे. कुख्यात पण मनाने चांगल्या असलेल्या गुंडाची भूमिका ही नक्कीच आकर्षक ठरणार आहे. या मालिकेच्या टीमसोबत चित्रीकरण करताना मला फार आनंद झाला आणि प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, अशी मला खात्री आहे.'

टॅग्स :पु. ल. देशपांडे