Join us  

Nilesh Sabale Birthday Special: ही आहे चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेची सुंदर पत्नी, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 6:00 AM

निलेशने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते.

ठळक मुद्देनिलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. त्यांच्या लग्नाला आठ वर्षांहून अधिक काळ झालेला असून त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे डॉ. निलेश साबळे हे नाव आज घराघरात पोहोचले आहे. या कार्यक्रमातील त्याचा वावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो. निलेशचा आज म्हणजेच ३० जूनला वाढदिवस असून त्याचे वडील शिक्षण खात्यात अधिकारी असल्याने त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे त्याचे बालपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेले आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईत राहात आहे. 

निलेशने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते. नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळेच मिळाली. आपलं लेखन, सूत्रसंचालन आणि विनोदवीरांच्या सोबतीने त्याने 'चला हवा येऊ द्या' शोला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. 

निलेशच्या अभिनयाचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे आज अनेक फॅन आहेत. तुम्हाला माहीत आहे का, निलेश हा आज अभिनेता असला तरी त्याने डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून त्याने आज अभिनेता, सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. निलेशने आयुर्वेदाची एम एसची पदवी घेतली असली तरी त्याला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो प्रसिद्ध होता. शिक्षण घेतल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

निलेश आज मोठा स्टार असला तरी तो इतर अभिनेत्यांप्रमाणे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह नसतो. त्याच्यामुळे त्याच्या  वैयक्तिक आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे. निलेशविषयी आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. निलेशचे लग्न झालेले असून त्याच्या पत्नीचे नाव गौरी साबळे आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षं झालेले असून त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे. निलेशच्या स्ट्रगलिंगच्या काळातही ती खंबीरपणे त्याच्यामागे उभी राहिली होती.  

टॅग्स :चला हवा येऊ द्या