Join us  

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर स्वीटूसमोर येणार सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:14 AM

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. मात्र मालिकेत त्या दोघांचे लग्न होत असताना असा ट्विस्ट आला की स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाले. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. आता मालिकेत ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे आणि त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

स्वीटूचे लग्न मोहितसोबत झाल्यानंतर ही मालिका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती आणि अजूनही होत आहे. या लग्नामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. त्यांना ओम आणि स्वीटू यांना एकत्र बघायचे आहे. लग्नानंतर स्वीटू मोहितसोबत ओमच्याच घरात राहत आहे. स्वीटूला हे लग्न मान्य नाही तरी देखील घरच्यांसाठी सर्व काही ठीक असल्याचे भासवत आहे. ओम लग्नाच्या दिवशी कुठे होता याचे खरे कारण स्वीटूला अद्याप माहित नाही. मात्र आता लग्नाच्या दिवशी जे काही घडले त्याबद्दल स्वीटूला तिच्या वडिलांकडून समजले आहे. ओम तिच्यावर किती प्रेम करते हे तिला समजले आहे. स्वीटूच्या हातात मंगळसूत्र दिसते आहे. म्हणजे तिनं मोहितसोबतचे नाते संपवल्याचे दिसते आहे. 

दरम्यान स्वीटूला ओमचे सत्य समजले पण तिकडे ओम शहर सोडून कायमचा जातो आहे. त्यामुळे आता सगळे समजल्यानंतर स्वीटू ओमला थांबवण्यासाठी गेली आहे मात्र त्याआधीच ओम हे शहर निघून जाईल का या दोघांची भेट होईल का आणि हे दोघे पून्हा एकत्र येतील का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.