Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tu tevha tashi :'तू तेव्हा तशी' मालिकेत जबरदस्त ट्विस्ट, आकाशच्या तावडीतून अनामिका सौरभला वाचवू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:39 IST

आकाशची एंट्री होताच अनामिका व सौरभच्या नात्यात नवं वळण आलं. आता मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत.

झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi ) ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची ही फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मालिका सुरू झाली तशी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सौरभच्या भूमिकेत असलेला स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि अनामिकाच्या भूमिकेत असलेल्या शिल्पा तुळसकरची (Shilpa Tulaskar) केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनामिकाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच आकाश जोशीची एंट्री झाली. 

आकाशची एंट्री होताच अनामिका व सौरभच्या नात्यात नवं वळण आलं. आकाशने अनामिकाला सौरभसोबत असलेलं नातं तोडायला सांगितलं होतं. त्याच ऐकून अनामिकाने सौरभला लग्नासाठी नकार दिला होता. पण पुन्हा आकाशचा विरोध झुगारून अनामिका सौरभकडे परत आली होती. आता मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत. 

सौरभ कामाच्या निमित्ताने अमेरिकेला गेलाय. इकडे तो नसताना अनामिका वाड्यात राहायला येते. सौरभने आकाश पासून संरक्षण व्हावं यासाठी सचिन, चंदु आणि नीलला सतत अनामिकाच्या सोबत राहण्याची ताकीद दिली आहे.आकाश वाड्यातील लोकांना प्रकारे त्रास देतच आहे. अनामिका मात्र या सगळ्याला पुरून उरते . वाड्यावर उत्साहात दिवाळी साजरी केली जातेय, सौरभ आणि अनामिका यांचा ऑनलाईन पाडवा होतो तर अनामिका भाऊबीजे निमित्त सचिनला ओवाळते.

आता आकाशने सौरभला किडनॅप केलेलं आहे. सौरभला मारहाण देखील केली आहे. दुसरीकडे अनामिकाला फोन लावून धमकावतो. अनामिका सौरभला आकाशच्या तावडीतून कसं वाचवणार, आकाश सौरभला खरंच जीवे मारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मालिकेचा हा दोन तासांचा विशेष भाग येत्या ६ नोव्हेंबर रोजी झी मराठीवर पाहता येईल. 

टॅग्स :झी मराठीसेलिब्रिटी