Join us

मालिकांचा नवा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:19 IST

गरिमा प्रोडक्शनची खटमल - ए - इश्क ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत कॉमिक ढंगात विविध ...

गरिमा प्रोडक्शनची खटमल - ए - इश्क ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत कॉमिक ढंगात विविध प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कथा ही 25 भागांची असणार आहे. एका महिन्यात केवळ एकच कथा दाखवण्याचा प्रोडक्शन हाऊसचा विचार आहे. पहिल्या कथेत उमंग जैन आणि विशाल मल्होत्रा झळकणार आहेत. तसेच अखिलेंद्रा मिश्रा आणि सुलभा आर्याही यात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सुलभा यांनी काही दिवसांपूर्वी बेगुसराई या मालिकेत काम केले होते तर अखिलेंद्र तू मेरा हिरो या मालिकेत झळकले होते. प्रत्येक कथा ही ठरावीक भागांचीच असल्याने या कथा प्रेक्षकांना आवडतील अशी निर्मात्यांना खात्री आहे.