Join us

सह्याद्री वाहिनीवर नवीन शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:11 IST

सह्याद्री वाहिनीवर नवीन ९ कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी केली आहे. यातील दोन मालिकांमध्ये ...

सह्याद्री वाहिनीवर नवीन ९ कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी केली आहे. यातील दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत रमेश भाटकर दिसणार आहेत. 'नाटकापासून करियरला सुरुवात झाली. माझे 'पियानो' हे नाटक पहिल्यांदा स्क्रिनवर झळकले ते सहयाद्रीवरच. तेव्हा फारच अप्रुप वाटले होते. नंतर अनेक मालिका, सिनेमे केले परंतु तो पहिला अनुभव अविस्मरणिय होता. त्यामुळेच माझे करियर घडविण्यात डीडी सहयाद्रीचा मोठा वाटा आहे', अशा भावना रमेश भाटकर यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या.डीडी सह्याद्री वाहिनी काल्पनिक आणि सत्य घटनांनवर आधारित नव्या कार्यक्रमांची फळी निर्माण करत आहे. या नवीन प्रवासाचा शुभारंभ 'पाषाणपती' या मालिकेद्वारे होणार आहे. ही एका देवदासीची कथा असून देवाच्या मूर्तीशी लग्न लावून देण्याच्या परंपरेविरुद्ध तिचा लढा सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. संजय बोरकर निर्मित व रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेली 'माती कोकणची नाती जन्माची' ही मालिका रात्री ८:३0 वाजता प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. वामन मल्हार जोशी यांच्या 'सुशीलेचा देव' या कांदबरीवर आधारित नरेश भिडकर दिग्दर्शित व साक्षी नागवेकरची प्रमुख भुमिका असलेली 'सुशीलेचा देव' ही मालिका रात्री ९ वाजता येत आहे. लहान मुलांच्या खोड्या आणि त्यांना पाठीशी घालणारी आजी हे समिकरण पुन्हा एकदा 'बंड्या टेलिव्हिजन' या कार्यक्रमाद्वारे उलगडणार आहे.